Surabhi Jayashree Jagdish
एका काचेच्या बरणीत किंवा बाऊलमध्ये स्वच्छ पाणी घ्या. त्यात लिंबू पूर्णपणे बुडवून बरणी फ्रीजमध्ये ठेवा. दर २ ते ३ दिवसांनी पाणी बदलल्यास लिंबू जास्त काळ ताजे आणि रसदार राहण्यास मदत होते.
लिंबू थेट फ्रीजच्या ट्रेमध्ये उघडं ठेवू नका. लिंबू कोरडं करून झिपलॉक बॅगमध्ये किंवा एअरटाईट डब्यात भरून ठेवा. हवेचा संपर्क कमी झाल्यामुळे लिंबू लवकर सुकत नाही.
लिंबांच्या सालीवर अगदी थोडेसं खोबरेल तेल किंवा स्वयंपाकाचं तेल लावा. तेलाचा पातळ थर लिंबातील ओलावा बाहेर जाण्याचा वेग कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे लिंबू लवकर कोरडे पडण्याची शक्यता कमी होते.
प्रत्येक लिंबू वेगळ्या टिशू पेपरमध्ये किंवा साध्या कागदात गुंडाळून ठेवा. त्यानंतर हे लिंबू एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवता येतात. कागद अतिरिक्त ओलावा शोषून घेत असल्याने लिंबांवर बुरशी येण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.
कापलेला लिंबू उघडा ठेवल्यास त्याचा कापलेला भाग लवकर कोरडा होतो. त्या भागावर थोडे मीठ किंवा ऑलिव्ह ऑईल लावू शकता. किंवा लिंबू एका छोट्या एअरटाईट कंटेनरमध्ये कापलेला भाग खाली ठेवून साठवू शकता.
घरात जास्त लिंबू असतील तर त्यांचा रस काढून घ्या. हा रस आईस क्यूब ट्रेमध्ये भरून फ्रीजमध्ये गोठवून ठेवता येतो. तयार झालेले लिंबाच्या रसाचे क्यूब्स महिनाभर स्वयंपाकात किंवा सरबतात वापरता येतात.
बाजारातून आणलेले लिंबू लगेच धुऊन ओलं ठेवणं टाळा. लिंबांवर जास्त ओलावा राहिल्यास बुरशी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे लिंबू कोरड्या जागी ठेवा आणि वापरण्याच्या वेळीच धुवा.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.