Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

Surabhi Jayashree Jagdish

हार्ट अटॅक

हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर अनेक प्रकारचे इशारे देते. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा इशारा म्हणजे शरीराच्या काही विशिष्ट भागांमध्ये होणारी वेदना. ही वेदना अनेकदा छातीपासून सुरू होऊन इतर भागांपर्यंत पसरते.

heart attack warning signs | saam tv

हार्ट अटॅकपूर्वीची लक्षणं

छातीतील दडपणासोबत श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. घाम येणं, मळमळ किंवा चक्कर येणं ही लक्षणंही दिसू शकतात. अचानक थकवा जाणवणं हेही एक महत्त्वाचे संकेत आहे. ही लक्षणे अनेकदा हलकी वाटतात पण ती धोकादायक असू शकतात.

heart health tips | saam tv

धोक्याची पातळी

हार्ट अटॅक ही एक जीवघेणी स्थिती आहे आणि तातडीने उपचार गरजेचे असतात. वेळेत उपचार न मिळाल्यास हृदयाचं नुकसान होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये मृत्यूचा धोका वाढतो.

early heart attack signs | saam tv

लाईफस्टाईलचा परिणाम

अनियमित आहार, जास्त तेलकट अन्न आणि व्यायामाचा अभाव हार्ट अटॅकचा धोका वाढवतो. धूम्रपान आणि मद्यपान हे देखील मोठी कारणं आहेत. हार्ट अटॅक येण्यापूर्वी कोणत्या भागात वेदना होतात ते पाहूयात.

left arm pain heart attack | saam tv

छातीतील वेदना

हार्ट अटॅकपूर्वी सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीच्या मध्यभागी दाब किंवा जडपणा जाणवणं. काही लोकांना ही वेदना जळजळ किंवा अस्वस्थता म्हणूनही जाणवते. ही वेदना काही मिनिटे टिकू शकते किंवा पुन्हा पुन्हा होऊ शकते.

heart disease symptoms | saam tv

डावा हात आणि खांदा

हार्ट अटॅकपूर्वी वेदना डाव्या हातापर्यंत पसरू शकते. विशेषतः खांदा आणि कोपरापर्यंत दुखणं जाणवतं. काही वेळा दोन्ही हातांमध्येही अस्वस्थता जाणवू शकते. ही वेदना अनेकदा छातीतील वेदनेसोबत सुरू होते.

heart attack prevention | saam tv

मान, जबडा आणि पाठ

हार्ट अटॅकपूर्वी वेदना मान, जबडा आणि वरच्या पाठीपर्यंत जाऊ शकते. विशेषतः खालच्या जबड्यात किंवा गळ्यात ताण जाणवतो. काही लोकांना पाठदुखी म्हणूनही हा त्रास जाणवतो. ही वेदना हळूहळू वाढत जाते आणि छातीतील त्रासाशी जोडलेली असते.

shortness of breath symptoms | saam tv

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

heart emergency signs | saam tv
येथे क्लिक करा