Heart Attack Warning Signs: हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही तास अगोदर त्वचा देते संकेत; चेहऱ्यावर दिसणारे हे 5 बदल ओळखा

Heart disease symptoms: हार्ट अटॅकचा धोका ओळखण्यासाठी चेहरा आणि त्वचेतील बदल समजून घ्या. चेहरा फिकट पडणे, थंड घाम येणे, ओठ निळे पडणे आणि डोळ्यांभोवती पिवळे डाग दिसणे यांचा आरोग्याशी काय संबंध आहे, जाणून घ्या.
Heart disease symptoms
Heart disease symptomssaam tv
Published On: 

हार्ट अटॅकचं नाव ऐकलं की अनेकांच्या मनात सर्वात आधी छातीत दुखणं, धाप लागणं आणि खूप घाम येणं ही लक्षणं येतात. पण हृदयाच्या आरोग्याबाबत काही संकेत आपल्या चेहऱ्यावर आणि त्वचेवरही दिसू शकतात, याची तुम्हाला कल्पना आहे का? त्वचेत किंवा चेहऱ्यावर अचानक होणारे काही बदल शरीरातील तुम्हाला आरोग्याबाबत संकेत देतात. त्यामुळे अशा बदलांकडे दुर्लक्ष करू नये. मात्र केवळ चेहरा किंवा त्वचेतील बदल पाहून हार्ट अटॅक येणार आहे, असं सांगता येत नाही.

दिल्लीतील सीके बिर्ला रुग्णालयाचे कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. अंशुल कुमार जैन यांच्या मते, त्वचेतील काही बदल शरीरातील रक्तप्रवाह कमी होणं, ऑक्सिजनची कमतरता किंवा कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्यांचे संकेत असू शकतात. असे बदल दिसल्यास वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

Heart disease symptoms
Kidney health: तुमच्या किडनीला होऊ शकतो धोका; या ७ वाईट सवयी आताच सोडा, अन्यथा...

चेहरा अचानक फिकट पडणं

एखाद्या व्यक्तीचा चेहरा अचानक खूप फिकट किंवा पिवळसर दिसू लागला तर शरीरातील रक्तप्रवाह कमी झाल्याचं ते एक लक्षण असू शकतं. हार्ट अटॅकच्या वेळी शरीर महत्त्वाच्या अवयवांपर्यंत रक्त पोहोचवतं. त्यामुळे त्वचेपर्यंत पोहोचणाऱ्या रक्ताचं प्रमाण कमी होऊ शकतं. परंतु चेहरा फिकट पडण्यामागे केवळ हृदयाची समस्या हेच कारण नसतं. शरीरात रक्ताची कमतरता असणं, रक्तदाब कमी होणं किंवा इतर आरोग्याच्या समस्यांमुळेही चेहरा फिकट दिसू शकतो.

त्वचा थंड पडणं

कोणतीही शारीरिक मेहनत न करता किंवा वातावरणात उकाडा नसतानाही अचानक खूप घाम येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी त्वचा थंड आणि चिकट झाल्यास ते हृदयाशी संबंधित गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं. घाम येण्यासोबत छातीत दडपण जाणवणं, चक्कर येणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं अशी लक्षणं दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

ओठ किंवा चेहऱ्यावर निळसरपणा दिसणं

ओठ, चेहरा किंवा बोटांच्या आसपासची त्वचा निळसर दिसू लागली तर शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याचा तो संकेत असू शकतो. वैद्यकीय भाषेत या स्थितीला 'सायनोसिस' असं म्हणतात. शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होण्यामागे हृदय किंवा फुफ्फुसांशी संबंधित गंभीर समस्या असू शकतात.

Heart disease symptoms
Itchy ears after bathing: आंघोळीनंतर तुमच्याही कानात सतत खाज येते? दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांनी सांगितलं कारण

त्वचा किंवा डोळे पिवळे पडणं

त्वचा किंवा डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागल्यास तो हार्ट अटॅकचा थेट संकेत असेलच असं नाही. अनेकदा असा बदल लिव्हरशी किंवा रक्ताशी संबंधित आजारांमुळे होऊ शकतो. मात्र ज्या व्यक्तींना आधीपासून हार्ट अटॅकचा धोका आहे त्यांनी अशा बदलांकडे दुर्लक्ष करू नये. त्वचा किंवा डोळे पिवळे पडल्यास त्यामागचं कारण समजून घेण्यासाठी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

डोळ्यांभोवती पिवळे डाग दिसणं

काही लोकांच्या डोळ्यांच्या पापण्यांजवळ लहान, पिवळसर डाग दिसतात. या डागांना वैद्यकीय भाषेत 'झँथेलाझ्मा' (Xanthelasma) म्हणतात. शरीरात कोलेस्ट्रॉल साचल्यामुळे असे डाग तयार होऊ शकतात. हे डाग दिसले म्हणजे त्या व्यक्तीला हार्ट अटॅक येणारच असं नाही. शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असल्याचा हा एक संकेत असू शकतो.

Heart disease symptoms
Drinks for Liver Health: यकृतावर घाणेरडी चरबी जमा झालीये? हे ६ ड्रिंक्स लिव्हर डिटॉक्स करण्यास ठरतील फायदेशीर

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com