High Cholesterol: त्वचेवर हे 5 बदल दिसले तर समजा हार्ट अटॅकचा धोका हळूहळू वाढतोय, कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं समजून घ्या

High Cholesterol Skin Problems: कोलेस्ट्रॉल वाढल्याचे काही संकेत त्वचेवर दिसू शकतात. डोळ्यांभोवती पिवळे डाग, त्वचेवर गाठी यांसारख्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका. झॅन्थेलाझ्मा आणि झॅन्थोमा म्हणजे काय, कोणती लक्षणं इतर कारणांनीही दिसू शकतात आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी कधी करावी ते वाचा.
High Cholesterol
High Cholesterolsaam tv
Published On: 

अनेकांना वाटतं की डोकेदुखी, थकवा किंवा छातीत दुखणं ही कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं आहेत. पण तुम्हाला माहितीये का, कोलेस्ट्रॉल वाढल्याचे काही संकेत आपल्या त्वचेवरही दिसू शकतात? हे संकेत वेळीच ओळखले तर पुढील आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे त्वचेवर दिसणाऱ्या या पाच लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या सामान्य झालीये. अनेकांना वाटतं की वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचा परिणाम फक्त हृदयावर होतो. मात्र त्याचा परिणाम त्वचेवरही दिसू शकतो. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास काही बदल त्वचेवर जाणवू शकतात. हे बदल वेळीच लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

High Cholesterol
High Cholesterol: शरीरात साचलेलं कोलेस्ट्रॉल झटक्यात निघेल बाहेर; फक्त दररोज सकाळी चावून खा हे 1 पाच रूपयांचं हिरवं पान

डोळ्यांच्या आजूबाजूला पिवळे डाग दिसणं

डोळ्यांच्या आसपास किंवा पापण्यांवर छोटे पिवळे डाग दिसू लागले, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. या डागांना 'झॅन्थेलाझ्मा' असं म्हणतात. रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे असे डाग दिसू शकतात. विशेष म्हणजे या डागांमुळे वेदना होत नाहीत. पण कालांतराने त्यांचा आकार वाढू शकतो. हे वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं एक लक्षण असू शकतं.

हात-पायांवर गाठी येणं

त्वचेवर लहान पिवळ्या रंगाच्या किंवा मेणासारख्या गाठी दिसू लागल्या तर तेही कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण असू शकतं. या गाठींना 'झॅन्थोमा' म्हणतात. शरीरात अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे अशा गाठी तयार होतात. कोपर, गुडघे, हात आणि पायांवर त्या जास्त दिसून येतात.

त्वचेला खाज सुटणं

कोणतंही कारण नसताना त्वचेला सतत खाज सुटत असेल जळजळ होत असेल किंवा त्वचा लाल होत असेल तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काही वेळा कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्वचेपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही आणि खाज किंवा जळजळ जाणवू शकते.

High Cholesterol
Juice For Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेलं कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढतील 3 ज्यूस; रोज पिण्याची सवय लावाच

पाय थंड पडणं

तुमचे पाय नेहमी थंड राहत असतील किंवा छोट्या जखमा आणि कापलेली जागा बरी होण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर हे रक्तप्रवाह कमी झाल्याचं लक्षण असू शकतं. रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर जमा झाल्यामुळे रक्ताचा प्रवाह मंदावतो. परिणामी हात-पाय थंड पडतात आणि जखमा भरून येण्यास उशीर लागतो.

नखांचा आणि त्वचेचा रंग बदलणं

नखांचा रंग पिवळसर किंवा निळसर होत असेल तर त्याकडेही दुर्लक्ष करू नका. शरीरातील रक्तप्रवाह योग्य प्रकारे होत नसल्यास नखं आणि त्वचेला पुरेसं पोषण मिळत नाही. त्यामुळे नखांचा आणि त्वचेचा रंग बदलू शकतो. यासोबतच नखांची मजबुतीही कमी होऊ शकते.

High Cholesterol
High Cholesterol: शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलंय? हे 5 पदार्थ खेचून बाहेर काढतील रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.