Pandharpur Ganpati Utsav : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागानदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. गणेश भक्तांनी चंद्रभागेच्या पात्रात गणेश मूर्तीचे विसर्जन न करता नदीपात्रातील कुंडात करावे असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेने केले आहे. (Maharashtra News)
पालिकेने गणेश मूर्ती विसर्जनासाठी नदीपात्रामध्ये पाच ठिकाणी कुंड तयार केले आहेत. या कुंडामध्ये पुरेशा पाण्याची व्यवस्था देखील केली आहे. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा दुधडी भरून वाहत आहे.
उद्या अनंत चतुर्थीच्या (anant chaturdashi) दिवशी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. अनेक भाविक चंद्रभागेच्या पात्रात विसर्जन करतात. त्यामुळे चंद्रभागेच्या पाण्याचे प्रदूषण होते.
हे प्रदूषण रोखण्यासाठी नगरपालिकेने 14 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारली आहेत. शिवाय नदीपात्रामध्ये पाच ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनासाठी कुंड तयार केले आहेत. कुंडा मध्येच गणेश मूर्तीचे विसर्जन करावे असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.