Kolhapur Ganpati Visarjan : बाप्पांच्या विसर्जनासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, पंचगंगा नदी परिसरात पाेलीसांचा तगडा बंदाेबस्त

या विसर्जन सोहळ्यासाठी महापालिका अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे.
kolhapur, ganeshotsav 2023, ganesh visarjan 2023
kolhapur, ganeshotsav 2023, ganesh visarjan 2023saam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur Ganpati Visarjan 2023 : गणेश चतुर्थीच्या पाचव्या दिवशी आज गौरी गणपती विसर्जनाने घरगुती गणेशोत्सवाची सांगता होत आहे. लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी भाविकांबराेबरच कोल्हापूर महानगरपालिका सज्ज झालेली आहे. (Maharashtra News)

kolhapur, ganeshotsav 2023, ganesh visarjan 2023
'सीएम महाराष्ट्रात कुठूनही निवडून येतील', आदित्य ठाकरेंच्या 'ओपन चॅलेंज' वर एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांला विश्वास

गणेश चुतर्थीला कोल्हापूरकरांनी शाहूपुरी कुंभार गल्ली , बापट कॅम्प, पापाची तीकटी या परिसरातून ढोल ताशाच्या गजरात आणि कोल्हापुरी हलगीच्या ठेक्यात गणपती बाप्पाचा जयघोष करत आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणले हाेते.

kolhapur, ganeshotsav 2023, ganesh visarjan 2023
Aditya Thackeray In Kokan : तुमचं आमचं नव्हे हे गद्दार, गँगस्टर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरांचे सरकार : आदित्य ठाकरे

त्यानंतर गाैराईचे देखील माेठ्या थाटामाटात आगमन झाले. शुक्रवारी गाैरीईची पूजा माेठा उत्साहात पार पडली. आज उत्सवाचा पाचवा दिवस असून लाडक्या गणरायाला अनेक घरातून निराेप दिला जाताे.

आज गौरी गणपती विसर्जनाने घरगुती गणेशोत्सवाची सांगता होणार असल्याने कोल्हापूर महानगरपालिका सज्ज झालेली आहे. महापालिकेकडून ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे.

जास्तीत जास्त गणेश मूर्तीचं विसर्जन व्हावं यासाठी महापालिकेच्या इराणी खण इथं गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. इराणी खणीत साधारण कोल्हापूर शहर आणि परिसरातील 55 ते 60 हजार घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. या (ganeshotsav) विसर्जन सोहळ्यासाठी महापालिका अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे.

पंचगंगेतच विसर्जन करणार : हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका

दरम्यान पंचगंगा नदीत गणेश मूर्तींचे विसर्जन करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. त्यास हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. यासाठी पंचगंगा परिसरात मोठा पोलीस फाटा तैनात असून पंचगंगा नदी परिसरात मोठा तणाव दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

kolhapur, ganeshotsav 2023, ganesh visarjan 2023
Kolhapur News : कानशिलात मारु म्हणता... आमदार भडकले, म्हणाले आम्हांलाही...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com