Accident : भरधाव कार कालव्यात कोसळली, नवरा बायकोचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, पैठणमध्ये भयंकर अपघात

Paithan canal car accident latest update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणजवळ भरधाव कार कालव्यात कोसळून पती-पत्नीचा मृत्यू झाला तर बचावासाठी गेलेला तरुणासह तिघे बेपत्ता आहेत. घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे.
Chhatrapati Sambhajinagar Paithan Accident news
Chhatrapati Sambhajinagar Paithan Accident newsSaam TV
Published On

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी

Chhatrapati Sambhajinagar Paithan Accident news : छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या चांगतपुरी येथे सोमवारी रात्री भयंकर अपघाताची घटना घडली. मध्यरात्री भरधाव वेगात असणारी कार कालव्यात कोसळली. चालकाचा ताबा सुटल्याने कार कोसळल्याची माहिती मिळाली आहे. या भयंकर अपघातामध्ये नवरा-बायकोचा मृत्यू झाला. तर वाचवण्यासाठी गेलेला तरूणही बेपत्ता आहे. या भयंकर अपघातात चालक बचावला आहे. गंभीर जखमी असलेल्या चालकावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

तीन जण बेपत्ता, पती-पत्नी बुडाले

चालकाचा ताबा सुटल्याने कार चांगतपुरी येथील उजव्या कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत कारमधील पती-पत्नी आणि त्यांना वाचवण्यासाठी गेलेला तरुण असे तीन जण बेपत्ता झाल्याची झाले आहेत. सोमवारी रात्री ११.३० वाजता पैठणमधील चांगतपुरी येथे ही घटना घडली. कार कालव्यात कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पण पती-पत्नी अद्याप बेपत्ता आहेत. त्यांना वाचवण्यासाठी गेलेला तरूणही बेपत्ता झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Paithan Accident news
Pune : पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांचा अचानक छापा, खिडकीतून तरूणीची उडी, जागेवरच मृत्यू

नवरा-बायको कारसह पाण्यात बुडाले -

सोमवारी रात्री स्विफ्ट कार चांगतपुरी- पैठण रस्त्याने जात होती. कारमध्ये चालक अल्ताफ पठाण, मुखीद शेख व त्यांची पत्नी निलोफर मुखीद शेख (दोघे रा. कोरडगाव, ता. शेवगाव) असे तिघेजण होते. चांगतपुरी गावाजवळील कालव्याच्या पुलालगत चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार कालव्यात गेली. दरम्यान, चालकाने प्रसंगावधानता बाळगत कारबाहेर उडी मारली. कालव्याला पाणी असल्यामुळे कारमधील पती-पत्नी असे दोघे कारसह पाण्यात बुडाले.

Chhatrapati Sambhajinagar Paithan Accident news
Air Ambulance Crash : एअर अ‍ॅम्ब्युलन्स क्रॅश, रूग्णासह ७ जणांचा मृत्यू; कुठे घडली दुर्घटना?

वाचवायला गेलेला तरूणही बेपत्ता

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा जेसीबीने कार पाण्याबाहेर काढण्यात आली. यावेळी स्थानिकांपैकी रावसाहेब खडेकर हा बचावकार्यासाठी पाण्यात उतरला होता. परंतु मदत करताना पती-पत्नीसह तोदेखील बेपत्ता झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पाण्यात बेपत्ता झालेल्या तिघांचा शोध सुरू होता.

Chhatrapati Sambhajinagar Paithan Accident news
War Fears : इराण सोडा! भारतीयांना मोदी सरकारने का दिले आदेश? नेमकं काय आहे प्रकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com