Maharashtra Weather : ऑक्टोबर हिट आधीच सुरू! 'या' भागांत पुढील ४ दिवस परतीचा पाऊस, तर काही जिल्ह्यांत उन्हाचे चटके वाढणार

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून पुढील ४ दिवस पुणे, अहिल्यानगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मराठवाड्यात कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज असून ऑक्टोबरच्या सुरुवातीला तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
Maharashtra weather update
Maharashtra weather updatesaam tv
Published On: 

Maharashtra weather forecast for next four days : महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला असून, येत्या पुढील ४ दिवसांत राज्यांतील काही भागांत तुरळक पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह पुणे आणि अहिल्यानगर परिसरामध्ये पुढील चार दिवस पावसाच्या सरी कोसळू शकतात. मात्र, दुसरीकडे मराठवाड्यात या काळातही परतीचा पाऊस पडण्याची चिन्हे नसून तेथे कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. (October Heat)

अल निनोचा फटका अन् दुष्काळी परिस्थिती

हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून येण्यापूर्वीच अल निनोच्या (El Niño) प्रभावामुळे पाऊस कमी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्ष मान्सूनच्या काळातही राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने काही तालुक्यांमध्ये आधीच दुष्काळ जाहीर करावा लागला आहे.

Maharashtra weather update
ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा! महिलांकडून शिंदे गटाच्या युवासेनेच्या नेत्याला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

सप्टेंबरमध्येच 'ऑक्टोबर हिट'च्या झळा

यंदा ऑक्टोबर महिन्यात जाणवणारी उकाड्याची तीव्र तीव्रता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच जाणवू लागली आहे. आकाश निरभ्र असणे आणि हवेतील आर्द्रता (ह्युमिडिटी) वाढल्यामुळे नागरिकांना उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत. येत्या ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही असेच कडक ऊन राहील आणि किमान तापमानात सुमारे २ अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते, असे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.

Maharashtra weather update
Ramesh Mhatre Case : शिंदेसेनेच्या नेत्याला सर्वोच्च न्यायालयाचा जोरदार धक्का, डॉक्टर मारहाण प्रकरणी अटक होणार?

५ दिवस कोणत्या जिल्ह्यात पाऊस

पुढील ४ ते ५ दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे आणि पुण्यासह अहिल्यानगर भागात तुरळक पावसाची शक्यता असून हा पाऊस परतीचा आहे. मात्र या परतीचा पावसाचा प्रभाव मराठवाड्यातील कुठल्याही जिल्ह्यांवर होणार नाही अशी शक्यता सुद्धा वेधशाळेने वर्तवली आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून तीन दिवसांपूर्वीसुद्धा पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारी दुपारनंतर पुण्यातील एक ठिकाणी भागात वातावरण ढगाळ झाले होते तसेच काही ठिकाणी तुरळ ते मुसळधार पावसाने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com