ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा! महिलांकडून शिंदे गटाच्या युवासेनेच्या नेत्याला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Siddhu Abhange, Thane News: ठाण्यातील कोपरी परिसरात शिंदे गटाच्या युवासेनेचे कार्यकर्ते सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Siddhu Abhange, Thane News:
Siddhu Abhange, Thane News:
Published On: 

विकास काटे, ठाणे प्रतिनिधी

Siddhu Abhange latest news : ठाण्यातील कोपरी परिसरात शिंदे गटाच्या युवासेना कार्यकर्त्याला महिलांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, पोलिसांसमोरच ही मारहाण झाल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव सिद्धू अभंगे असे आहे.

ठाण्यातील कोपरी परिसरात रविवारी (२७ सप्टेंबर) रात्री सुमारे ११:१५ वाजेच्या सुमारास ही मारहाणीची घटना घडली. जुन्या कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या महिलांनी युवासेना कार्यकर्ता सिद्धू अभंगे याला बेदम चोप दिला. या प्रकारामुळे कोपरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Siddhu Abhange, Thane News:
हातात हातोडा,पकड आणि दोरी; शिवसेना नेत्याच्या घरात पहाटे तरूण शिरला अन्...पुढे जे घडलं त्याने पोलीसही चक्रावले

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरी परिसरात जुन्या कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे सिद्धू अभंगे याने व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे. "हा व्यवसाय शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुढाकाराने व आशीर्वादाने सुरू झाला आहे," असे सांगत संतप्त महिलांनी अभंगे याला जाब विचारला.

Siddhu Abhange, Thane News:
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंमुळे भाजप जिवंत, नाहीतर अस्तित्वच राहिलं नव्हतं; शिंदे गटाच्या आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

त्यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतप्त महिलांनी सिद्धू अभंगे याला कोपरी पोलीस ठाण्याच्या आवारातच बेदम मारहाण केली. थेट पोलीस ठाण्याच्या परिसरातच हा प्रकार घडल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com