Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Rain Alert In Maharashtra: राज्यातील अनेक जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Rain Alert In MaharashtraSaam Tv
Published On: 
  • महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज

  • पश्चिम महाराष्ट्रात अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज

  • पुणे, सातारा, कोल्हापूर, आणि सांगलीला येलो अलर्ट

  • विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update: गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने राज्यात पुन्हा जोर धरला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काही जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्यासाठी पौषक वातावरण तयार होत आहे. तर आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर, सांगली याठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव या जिल्ह्यांत देखील अशाच पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण आणि ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Maharashtra Rainfall: पुढचे ५ दिवस तुफान पावसाचे, विजांचा कडकडाट अन् वादळी वारे; कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

हवामान तज्ज्ञांनी म्यानमारजवळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची चिंता व्यक्त केली आहे. दिल्ली-एनसीआरच्या आसपास एक प्रणाली विकसित होत आहे. यामुळे पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव निर्माण होऊन मुसळधार पाऊस होऊ शकतो. मध्य प्रदेशवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून त्यामुळे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात पाऊस तुफान पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने असे देखील सांगितले की, छत्तीसगडवरील कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्णत: कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतरित झाले आहेत. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड आणि आंध्र प्रदेशमध्ये हवामान पुन्हा बदलू शकते.

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Rain : पुढील २४ तास अत्यंत मुसळधार! ८ राज्यांमध्ये अति-मुसळधार पावसाचा हायअलर्ट; महाराष्ट्रात हवामानाचा काय अंदाज?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com