Crime : कोल्हापूर हादरले! माजी महिला सरपंचाचा खून, मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रियकराला बेड्या

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील माजी महिला सरपंच सुरेखा न्यारे यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. लग्नासाठी दबाव टाकत असल्याच्या कारणावरून प्रियकराने गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे.
Police investigation after the murder of former woman sarpanch Surekha Nyare in Kolhapur.
Police arrest accused in former Kolhapur woman sarpanch murder case.
Published On

रणजीत माजगावकर, कोल्हापूर प्रतिनिधी

Kolhapur Latest Crime Updates : लग्नासाठी सतत तगादा लावणाऱ्या प्रेयसीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष समोर आला आहे.

खून केल्यानंतर आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतःच्या कारमधून भिवंडीकडे घेऊन जात असताना भिवंडी पोलिसांनी संशयावरून वाहनाची तपासणी केली. त्यावेळी हा खून उघडकीस आला.

Police investigation after the murder of former woman sarpanch Surekha Nyare in Kolhapur.
Gold Rate Today : खरेदीदारांना दिलासा! सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळा ₹१६९० ने स्वस्त, जाणून घ्या 22k आणि 24k चा भाव

या प्रकरणी संशयित प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील याला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, लग्नासाठी दबाव आणत असल्याच्या कारणावरून आरोपीने ही हत्या केली. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास भिवंडी आणि शाहूवाडी पोलीस करत आहेत.

Police investigation after the murder of former woman sarpanch Surekha Nyare in Kolhapur.
BJP Maharashtra : भाजपाच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल, दिग्गज महिला नेत्याला जातिवाचक शिवीगाळ, राज्यात खळबळ

लग्नासाठी मागे लागलेल्या प्रेयसीचा काटा काढून तिच्या मृतदेहाची भिवंडीत विल्हेवाट लावण्याचा प्रियकराचा प्लॅन होता. मात्र, कारमधून मृतदेह वाहून नेणाऱ्या या नराधमाचा डाव पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने शाहूवाडूत एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com