Rain : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, १३ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी ; हवामान खात्याने काय अंदाज दिला?

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता असून १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा IMD ने अंदाज वर्तवला आहे.
Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान खात्याने काय अंदाज दिला?
Maharashtra Today Weather Update NewsSaam Tv
Published On

महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. IMD च्या ताज्या अंदाजानुसार, आज राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिकसह १३ जिल्ह्यांना आजसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

वादळी वारे अन् विजांचा कडकडाट

हवामान खात्याच्या माहितीनुसार, रविवारी हवामानातील बदलांमुळे अनेक भागांत ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात ढगांच्या गडगडाटासह अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. अचानक येणाऱ्या या वादळी पावसामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान खात्याने काय अंदाज दिला?
Today's Horoscope: या ६ राशींसाठी आजचा दिवस ठरणार 'गोल्डन संडे'! कोणावर होणार पैशांचा पाऊस? पाहा १२ राशींचे भविष्य

'या' १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट:

हवामान विभागाने प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर उर्वरित महाराष्ट्र आकाश ढगाळ राहणार आहे. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तवली आहे.

Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान खात्याने काय अंदाज दिला?
Accident : स्कूल बसमधून पडून ७ वर्षांच्या ईश्वरी ठाकरेचा मृत्यू; धक्कादायक घटनेनं खळबळ

नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

आज मुसळधार पावसासोबत ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहणार असल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच विजांचा कडकडाट होणार असल्याने विजा चमकत असताना झाडांखाली, विजेच्या खांबांजवळ किंवा उघड्या शेतात थांबणे टाळावे. अचानक येणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com