मेष (Aries)
रविवारचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण होतील, ज्यामुळे मानसीक ताण कमी होईल. आर्थिक चिंता दूर होईल. नोकरी आणि व्यवसायात उत्तम परिणाम मिळतील. कुटुंबाचे सहकार्य लाभेल.
वृषभ (Taurus)
दिवस खूप चांगला जाईल. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. तुमची आर्थिक स्थिती भक्कम राहील. कोण्या खास व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंददायी राहील आणि आरोग्य उत्तम असेल.
मिथुन (Gemini)
आज थोडे सांभाळून चालण्याची गरज आहे. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. पैशांशी संबंधित व्यवहार विचारपूर्वक करा. कुटुंबाची साथ मिळेल. नातेसंबंधातील जुने गैरसमज दूर होतील. आरोग्य सामान्य राहील.
कर्क (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा दिवस नव्या संधी घेऊन येईल. नोकरीत असणाऱ्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो. मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत पर्यटनाची किंवा बाहेर जाण्याची योजना बनेल. आर्थिक बाजू मजबूत होईल.
सिंह (Leo)
तुमचा दिवस अत्यंत शुभ राहील. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. व्यापारात चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जुन्या वादांवर तोडगा निघेल.
कन्या (Virgo)
कामाचा व्याप थोडा वाढू शकतो आणि पळापळ होईल. नोकरी करणाऱ्यांवर नवीन जबाबदारी येऊ शकते. पैशांचे निर्णय विचारपूर्वक घ्या. घरातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
तुला (Libra)
तुला राशीसाठी हा दिवस मोठा दिलासा देणारा ठरेल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. नात्यांमध्ये जवळीक वाढेल. आरोग्य साथ देईल.
दिवस चांगला जाईल. कामात मन लागेल आणि प्रलंबित कामे गती पकडतील. जवळच्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा. नात्यात गोडवा कायम राहील.
धनु (Sagittarius)
दिवस सामान्य राहील. रोजची कामे वेळेवर पूर्ण होतील. जुन्या मित्राशी संवाद होऊ शकतो. पैशांच्या बाबतीत अजिबात निष्काळजीपणा करू नका. कुटुंबाचे पूर्ण सहकार्य लाभेल.
मकर (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस अतिशय उत्तम सिद्ध होईल. नोकरी आणि व्यापारात काही मोठ्या संधी चालून येतील. आर्थिक स्थिती बळकट होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल.
दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. लहान-सहान गोष्टींवरून ताण घेऊ नका. कामाच्या ठिकाणी स्थिती सामान्य राहील. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने बजेट सांभाळा. नात्यात संयम ठेवा.
मीन (Pisces)
दिवस ठीकठाक राहील. जुने काम पूर्ण झाल्याने मनाला शांतता लाभेल. नोकरी-व्यवसायात मेहनतीचा फायदा दिसून येईल. पैशांच्या व्यवहारात घाई करू नका. कौटुंबिक वातावरण छान राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.