Ramesh Mhatre Case : शिंदेसेनेच्या नेत्याला सर्वोच्च न्यायालयाचा जोरदार धक्का, डॉक्टर मारहाण प्रकरणी अटक होणार?

Ramesh Mhatre Case Update : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हात्रे यांचा जामीन रद्द करत वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याबाबत कडक भूमिका घेतली.
RAMESH MHATRE BAIL CANCELLED:
RAMESH MHATRE BAIL CANCELLED: Saam Tv
Published On: 

संघर्ष गांगुर्डे, कल्याण डोंबिवली प्रतिनिधी

Ramesh Mhatre Supreme Court bail cancellation : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या निर्णयानंतर पीडित डॉ. सृष्टी बाविस्कर यांचे वडील महेंद्र बाविस्कर यांनी न्यायव्यवस्थेचे आभार मानले. कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरवर हल्ला केल्याचा आरोप असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे . महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने त्यांना जामीन देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगितीही दिली आहे. म्हात्रे यांचा जामीन रद्द करताना, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की वैद्यकीय क्षेत्राला हात लावता येणार नाही, हा संदेश 'स्पष्टपणे' गेला पाहिजे.

RAMESH MHATRE BAIL CANCELLED:
UPI पेमेंट शुल्कावरून सर्वोच्च न्यायालय ॲक्शन मोडमध्ये; केंद्र सरकारसह RBI आणि NPCI ला नोटीस

सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटले?

सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणीदरम्यान डॉक्टरांवरील हल्ल्याच्या गंभीर परिणामांवर भाष्य करत अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ म्हणाले की, "वैद्यकीय क्षेत्र (डॉक्टर्स) हे जनसेवा आणि नागरिकांची सेवा करण्याचे काम करते. त्यांच्यावर अशा प्रकारे अजिबात हल्ला केला जाऊ शकत नाही. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कोणीही हात लावू शकत नाही (अशा प्रकारची हिंस्र वागणूक खपवून घेतली जाणार नाही)." या महत्त्वाच्या टिपणीसह सर्वोच्च न्यायालयाने आरोपी रमेश म्हात्रे यांचा जामीन रद्द करत त्यांना पुन्हा पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून कोठडीत जाण्याचे आदेश दिले.

RAMESH MHATRE BAIL CANCELLED:
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंमुळे भाजप जिवंत, नाहीतर अस्तित्वच राहिलं नव्हतं; शिंदे गटाच्या आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणखी दृढ झाला

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना महेंद्र बाविस्कर म्हणाले की, "या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवरील आमचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. डॉक्टर हे समाजात अहर्निश सेवा देण्याचे काम करतात. त्यामुळे कर्तव्य बजावत असताना त्यांना विनाकारण त्रास देणे, शिवीगाळ करणे किंवा त्यांच्यावर हात उचलणे कधीही खपवून घेतले जाऊ नये. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याचा योग्य धाक निर्माण होईल," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

RAMESH MHATRE BAIL CANCELLED:
ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा! महिलांकडून शिंदे गटाच्या युवासेनेच्या नेत्याला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

६ ऑक्टोबरला महत्त्वाची सुनावणी आणि साक्ष:

दरम्यान, हे प्रकरण कल्याण न्यायालयात फास्ट ट्रॅक कोर्टाअंतर्गत चालवले जात आहे. या प्रकरणातील पुढील महत्त्वाची सुनावणी येत्या ६ ऑक्टोबर रोजी होणार असून, त्यावेळी पीडित डॉ. सृष्टी बाविस्कर यांची मुख्य साक्ष नोंदवली जाणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राचे आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RAMESH MHATRE BAIL CANCELLED:
हातात हातोडा,पकड आणि दोरी; शिवसेना नेत्याच्या घरात पहाटे तरूण शिरला अन्...पुढे जे घडलं त्याने पोलीसही चक्रावले

डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर:

यावेळी महेंद्र बाविस्कर यांनी डॉक्टरांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. "सरकारी असो वा खासगी रुग्णालय, डॉक्टरांना कोणत्याही भीतीशिवाय रुग्णसेवा करता आली पाहिजे. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर शासनाने अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांचे संरक्षण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांविरोधातील कायदेशीर कारवाईचा मुद्दा राज्यभरात ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com