Breaking: संताेष परब हल्ला प्रकरण; दाेन्ही बाजूंचा युक्तीवाद पुर्ण; राणेंच्या जामीन अर्जावर बुधवारी निकाल

आज नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी हाेत आहे. न्यायालयात माजी खासदार निलेश राणे हे देखील उपस्थित आहेत.
Nitesh Rane
Nitesh RaneSaam Tv
Published On

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे कार्यकर्ते संताेष परब (santosh parab) यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीपुर्वी हल्ला झाला हाेता. या प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) हे सध्या न्यायालयीन काेठडीत आहेत. आज (मंगळवार) राणेंच्या जामीन अर्जावर (Nitesh Rane Bail Updates) जिल्हा सत्र न्यायालयात (court) सुनावणी झाली. (Nitesh Rane Latest Marathi News) दरम्यान आज दाेन्ही बाजूंचा युक्तीवाद झाला. न्यायालयाने उद्या (बुधवार, ता. ९ फेब्रवारी) सकाळी अकरा वाजता नितेश राणेंच्या जामीनावर निकाल देणार असल्याचे नमूद केले.

या सुनावणी दरम्यान दाेन्ही बाजूच्या वकीलांनी त्यांचे मुद्दे न्यायालया पुढं जाेरदार मांडले. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने प्रदीप घरत आणि भुषण साळवी हे कामकाज पाहत आहेत. नितेश राणेंच्या (nitesh rane) बाजूने संग्राम देसाई आणि सतीश मानशिंदे हे बाजू मांडत आहेत. (Nitesh Rane Bail Application Live Updates)

Nitesh Rane
Nitesh Rane: संताेष परब हल्ल्याचा कट व्हॅनिटी व्हॅनमध्ये रचला, ही तर सुपारीच : प्रदीप घरत

दरम्यान घरत यांनी युक्तवादी करताना CDR रिपोर्ट हे देखील महत्वाचे आहे. हे पुरावे दिसत नसले तरी ते महत्त्वाचे असल्याचं नमूद केले. माझ्या नंबरचे सिम कार्ड मी अयोग्य पद्धतीने वापरत असेन तर cdr रिपोर्ट नुसार समजतं. त्यामुळे हा महत्वाचा पुरावा आहे असा दावा घरत यांनी न्यायालयापुढं केला. यावेळी ऑगस्ट महिन्याचे संदर्भ दिले जात आहेत. त्यामुळे हे वेळकाढूपणा आहे असं सरकारी वकील प्रदीप घरत यांच्या युक्तिवादावर राणेंचे वकील सतीश मानेशिंदेनी आक्षेप घेतला. तसेच किती वेळ युक्तिवाद करणार हे न्यायालयास सांगा असे म्हटलं. (nitesh rane news)

Nitesh Rane
महाराष्ट्राच्या क्षेत्रात गुजरातमधील लोकांकडून छुपी मासेमारी

त्यानंतर घरत यांनी त्यांचा युक्तीवाद सुरु ठेवत सचिन सातपुते यांनी बॉईज आर रेडी असा मॅसेज त्या हल्लेखोरांना केला असं नमूद केले. त्यावर तुम्ही न्यायालयात मनोरंजन करता अशी टिप्पणी राणेंचे वकील मानशिंदेनी घरत यांच्यावर केली. त्यास प्रत्युत्तर देत मी माझं काम करतो असं घरत यांनी दिले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. चारही आरोपींचे जामीन नाकारले आहेत. त्यामुळे नितेश राणेंचा जामीन (bail) नाकारावा अशी मागणी घरत यांनी न्यायालयाकडे केली. राणेंचे वकील देसाईंनी यांनी नितेश राणेंच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत कोणत्याही प्रकारची माहिती पोलिसांना मिळाली नाही. सचिन सातपुतेचा जामीन नाकारतानाची परिस्थिती वेगळी होती आणि सध्याची परिस्थिती वेगळी आहे असं नमूद केले. त्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला. (nitesh rane latest updates)

Edited By : Siddharth Latkar

Nitesh Rane
तुमच्या घरी कुत्रा असेल तर सावधान; कुत्र्यांमध्ये पसरतोय 'हा' जीवघेणा आजार!
Nitesh Rane
Sindhudurg Live: संताेष परब हल्ला प्रकरण; नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com