Nitesh Rane: संताेष परब हल्ल्याचा कट व्हॅनिटी व्हॅनमध्ये रचला, ही तर सुपारीच : प्रदीप घरत

आज नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी हाेत आहे. न्यायालयात माजी खासदार निलेश राणे हे देखील उपस्थित आहेत.
Nitesh Rane
Nitesh RaneSaam Tv
Published On

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे कार्यकर्ते संताेष परब (santosh parab) यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीपुर्वी हल्ला झाला हाेता. या प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) हे सध्या न्यायालयीन काेठडीत आहेत. आज (मंगळवार) राणेंच्या (Nitesh Rane Latest Marathi News) जामीन (bail) अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. (Nitesh Rane Bail Updates) दाेन्ही बाजूंकडे जाेरदार युक्तीवाद सुरु आहे.

या सुनावणीपुर्वी दरम्यान झालेल्या युक्तीवादात दाेन्ही बाजूच्या वकीलांच्या एकमेकांत खडाजंगी झाली. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणेंच्या वकीलांवर दादागिरीचे गंभीर आराेप केले. दरम्यान न्यायालयाने दाेन्ही बाजू समजून घेत प्रत्यक्ष जामीन अर्जावर सुनावणीस प्रारंभ केला. (Nitesh Rane Bail Application Live Updates)

Nitesh Rane
Lata Mangeshkar: 'काेल्हापूरातील 'त्या' प्रसंगाची आठवण लतादीदींच्या स्मरणात, आजही निराेप यायचा'

राणेंचे वकील संग्राम देसाई युक्तीवाद करताना म्हणाले सुपारी देऊन हल्ला करायाला लावला असे मोठं मोठे शब्द सरकार पक्षाकडून वापरले जातात. पैसे दिले घेतले असा पोलिस तपासात कुठेही उल्लेख नाही. धीरज जाधवला सचिन सातपुतेने १० हजार दिले होते आणि सरकार पक्ष एक लाखाला सुपारी दिली असे म्हणताहेत. याबराेबरच ११ केसेस नीतेश राणेंवर असल्याचा आरोप तर दाेन केसेस राकेश परबवर असल्याचं सांगितले जातं आहे. मात्र यातील अनेक केसेस या खोट्या केसेस आहेत.

Nitesh Rane
Sindhudurg Live: संताेष परब हल्ला प्रकरण; नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु

काही केसेस ह्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल आहेत. कोणत्याही प्रकारची गुन्ह्यांची केस नाही. सर्व केस राजकीय नाही. नितेश राणेंवर सर्व खोट्या केस दाखल आहेत. राजकीय दबावातून अशा केस केल्या जात आहेत. अनेक केसमध्ये साक्षीदार येऊन गेले आहेत पण त्यांनी नितेश राणे यांचं नाव घेतलं नाही असे वकील संग्राम देसाई यांनी न्यायालयापुढं म्हणणं मांडले.

त्यापुर्वी व्हॅनिटी व्हॅनमध्ये कट रचला असा सरकारी पक्षाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे ती व्हॅनिटी व्हॅन तपासणीसाठी घेण्याची मागणी सरकारी पक्षाने न्यायालयास केली. जर यांच्या म्हणण्या नुसार कोकण रेल्वेमधून प्रवास केला असता आणि कट रचला असता तर कोकण रेल्वे गाडी तपासणीसाठी घेतली जाऊ शकते का? असा युवक्तीवाद सतीश मानशिंदे यांनी केला. त्यावर सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तीवाद सुरु आहे.

घरत म्हणाले गंभीर स्वरूपाची जखम नसल्याचं मानशिंदे यांनी म्हटलं होतं मात्र संतोष परब यांना गंभीर स्वरुपाची जखम होती. छातीवर गंभीर जखमी करून मारण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला. अंगावर गाडी घालून पाडल्यावर संतोष परब यांच्या अंगावर मोटरसायकल पडली. संतोष परब यांच्या अंगावर गाडी पडल्यानंतर ती गाडी बाजूला न करता त्यांच्या डाव्या बाजूला छातीवर चाकूने हल्ला करणं हा पूर्वनियोजित कट आहे.

Nitesh Rane
Sindhudurg : हे दादागिरी करताहेत! राणेंच्या जामीन अर्जावरील सुनावणीपुर्वी सरकारी वकील घरत यांचा गंभीर आराेप

सीसीटीव्हीत सगळं रेकॉर्ड झालंय

घरत पुढं म्हणाले हल्लेखोरांनी हल्ल्यात जी हत्यार वापरली ती ज्या ठिकाणा वरून घेतली त्याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना तपासात मिळाली आहेत. सुपारी सुपारी असं आम्ही म्हणतो अस नितेश राणेंचे वकील म्हणतात या हल्ल्यातील हल्लेखोर हे पुण्यातील आहेत. तसेच ते सचिन सातपुते जे पुण्याचे आहेत त्यांच्या संपर्कातील आहेत, मग हे सुपारी देऊन केलं गेलं नाही का? असा सवाल त्यांना केला. व्हॅनिटी व्हॅनमध्ये कट रचला हा जरी प्रमुख दुवा असला तरी देखील संतोष परब यांचा फोटो सचिन सातपुते यांना नितेश राणेंनी पाठवला हा महत्वाचा पुरावा आहे. ज्याला मारायचं आहे त्याचा फोटो पाठवा असं संशयित आरोपी म्हणताहेत म्हणजे ही तर सुपारीच अंसही घरत यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com