महाराष्ट्राच्या क्षेत्रात गुजरातमधील लोकांकडून छुपी मासेमारी

महाराष्ट्राच्या क्षेत्रात गुजरातमधील लोकांकडून छुपी मासेमारी
Fishing
Fishingsaam tv
Published On

नंदुरबार : नर्मदा नदीच्‍या महाराष्‍ट्राच्‍या परीक्षेत्रात गुजरात राज्‍यातील मच्‍छीमार छुप्‍या पद्धतीने मासेमारी करत आहेत. याबाबत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर यांनी चोरटी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या काहींना समज दिली आहे. (nandurbar news Hidden fishing from the people of Gujarat in the area of ​​Maharashtra)

Fishing
Nandurbar: स्ट्रॉबेरी शेती वाढली; उत्‍पादनही चांगले, पण करावी लागतेय रस्‍त्‍यावर विक्री

महाराष्ट्रातील (Maharashtra) पहिला मतदार असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील मनिबेली गावाच्या नर्मदा नदी परिसरात मच्छीमार सहकारी सोसायटीच्या माध्यमातून नर्मदा काठावरील लोकांच्या उपजीविकेसाठी गुजरात व महाराष्ट्राचे परिक्षेत्र वेगळे आहे. असे असतानाही गुजरात (Gujrat) राज्यातील मच्छीमार महाराष्ट्राच्या क्षेत्रात चोरट्या पद्धतीने मच्छीमारी करत असल्याचे आढळून आल्याने स्थानिक व बाहेरचे नागरिक यांच्यात भविष्यात वाद होऊ शकतो. त्यामुळे गुजरात राज्यातील डुढाखाल येथून आलेल्या आठ मच्छिमारांना समज देऊन या परिसरात मच्छीमारीसाठी येऊ नये; असे आवाहन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर (Megha Patkar) यांनी केले आहे.

कारवाईची मागणी

शासनाकडून दिलेल्या मच्छीमार सहकारी सोसायट्यांमध्ये सदस्य नाही. तरी देखील चोरट्या पद्धतीने मच्छीमारी करणाऱ्या गुजरात परिक्षेत्रातील मच्छीमारांवर संबंधित विभागाने कारवाई करावी; अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com