

पूर्व विदर्भाला मिळणार ३ नवे महामार्ग
विदर्भातील ६ जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार
४२ हजार कोटींचा हा सरकारचा मेगाप्लान
हे महामार्ग समृद्धी महामार्गासोबत जोडण्यास मदत करेल
विदर्भातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. विदर्भाचा विकास आता वेगाने होणार आहे. विदर्भात ३ नवे महामार्ग तयार केले जाणार आहेत. पूर्व विदर्भात ३ मोठ्या वेगवान महामार्गाचे जाळे विस्तारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने ३ द्रुतगती महामार्गांसह नवेगाव मोरे ते सुरजगड मार्गाच्या निधीला मंजुरी दिली. तब्बल ४२ हजार कोटींचा हा सरकारचा मेगाप्लान आहे. या प्रोजेक्टमुळे पूर्व विदर्भातील दळणवळणाला नवीन दिशा मिळणार आहे.
पूर्व विदर्भातील दळणवळणाला नवी दिशा देणाऱ्या नागपूर ते गोंदिया महामार्ग, नागपूर ते चंद्रपूर महामार्ग, भंडारा ते गडचिरोली द्रुतगती महामार्गासह नवेगाव मोरे ते सुरजागड मार्गाच्या निधीला राज्य सरकारने प्रशासकीय मंजुरी दिली. ४६० किलोमीटरच्या चारही प्रकल्पांचा एकत्रित प्रकल्प खर्च तब्बल ४२ हजार कोटीहून अधिक आहे. मोठ्या प्रकल्पांसाठी स्वतंत्र विशेष उद्देश वाहन अर्थात 'एसपीव्ही' स्थापन करण्यात आले आहेत. या महामार्गामुळे पूर्व विदर्भातील कृषी खनिज आणि औद्योगिक वाहतुकीला चालना मिळण्याची आशा आहे.
पूर्व विदर्भात तयार करण्यात येणाऱ्या या नवीन महामार्गाचा फायदा नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या ६ जिल्ह्यांना होणार आहे. या सर्व जिल्ह्या एकमेकांशी जोडले जाणार आहे त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुसाट होणार आहे. या महामार्गामुळे त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
महत्वाचे म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातील कोनसारी, सूरजागड यासारख्या दुर्गम भागात रस्ते पोहचल्यामुळे तेथील लोहखनिज आणि इतर उद्योगांना चालना मिळणार आहे. हे तिन्ही महामार्ग विदर्भातील प्रमुख केंद्रांना समृद्धी महामार्गासोबत जोडण्यास मदत करणार आहेत. त्यामुळे या सहाही जिल्ह्यातील नागरिकांना थेट मुंबईला जाण्याचा मार्ग देखील मोकळा होईल.
प्रस्तावित महामार्ग -
- नागपूर - गोंदिया द्रुतगती महामार्ग - १६२ किमी
- नागपूर - चंद्रपूर महामार्ग - २०४ किमी
- भंडारा - गडचिरोली - ९४ किमी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.