Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गानं लाज आणली, उदघटानाला जाण्यास गडकरींचा नकार

Mumbai Goa Highway latest update : मुंबई-गोवा महामार्गाचे काम १५ वर्षांनंतरही रखडले आहे. महामार्गाच्या उद्घाटनाला जाणार नसल्याचे नितीन गडकरींनी स्पष्ट केले असून अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
Nitin Gadkari statement on Mumbai Goa Highway
Nitin Gadkari statement on Mumbai Goa HighwaySaam TV
Published On

Nitin Gadkari statement on Mumbai Goa Highway : तब्बल 15 वर्षे उलटून गेली तरी मुंबई-गोवा महामार्गाचं काम काही पूर्ण झालेलं नाहीये. त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या विधानानं हा महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मुंबई-गोवा महामार्गानं नितीन गडकरींना लाज का आणलीये?... कोणत्या नव्या विक्रमाची गडकरींनी घोषणा केलीये?.... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट....

गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी मुंबई-गोवा हायवेची चर्चा रंगते. कारण मुंबईतल्या कोकणवासियांचा मुंबई-गोवा महामार्ग हा हक्काचा रस्ता...मात्र या हायवेचं काम गेल्या कित्तेक वर्षांपासून रखडल्यानं त्याच्या दरवर्षी रस्ता पूर्ण करण्याबाबत नवनव्या तारखा जाहीर होत असतात. यंदाही सालाबादाप्रमाणे महामार्गावरील 90 टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनानं केलाय. मात्र या हायवेनं लाज आणलीय. कारण या हायवेच्या उदघाटनाला जाणार नसल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरींनी जाहीर केलंय. गडकरींना नेमकं कसली लाज वाटतेय आणि ते नेमकं काय म्हटले आहेत ते ऐकूयात...

Nitin Gadkari statement on Mumbai Goa Highway
राजकारणात मोठा भूकंप! भाजपने सोडली बंडखोर खासदारांची साथ; स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय

मुंबई-गोवा महामार्ग रखडल्यानं गडकरींनी अनेकदा जाहीररीत्या प्रशासकीय यंत्रणांचे वाभाडे काढले आहेत. यावेळीही त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या कारभारावर टीका करताना नवा विश्व विक्रम करण्याची घोषणाही केली...नेमकं काय म्हटले ते पाहूयात..

Nitin Gadkari statement on Mumbai Goa Highway
साताऱ्यात खळबळजनक प्रकार! भाजपच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

गडकरींनी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारण्याची घोषणा केली असली तरी या महामार्गाचं कंत्राट घेणारे ठेकेदार टिकतच नसल्याची कबुली गडकरींनी यापूर्वी अनेकदा दिलीय. त्यामुळे कुणाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार हा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे मुंबई-गोवा हायवे केवळ १० टक्के रखडलेला दिसत असला तरी आतापर्यंतचा इतिहास पाहता तो नेमका कधी पूर्ण होणार आणि त्याचे कधी उदघाटन होणार याबाबत सर्वांनाच शंका आहे. त्यामुळेच की काय गडकरींनी हात दाखवून अवलक्षण न करण्याचं ठरवलेलं दिसतंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com