संभाजी थोरात, कराड प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी
Amol Mane, Satara BJP Leader : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट शासकीय कागदपत्रे आणि शिक्के तयार केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यावर करण्यात आला आहे. फसवणूक केल्याप्रकरणी भाजपच्या पाटण तालुका युवा मोर्चाचा अध्यक्ष अमोल माने याच्यावर मल्हारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्हारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामपंचायतीत फसवणूक केल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकऱणी कसून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील ठोमसे ग्रामपंचायतीच्या बनावट कागदपत्रांप्रकरणी अमोल माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट शासकीय कागदपत्रे व शिक्के तयार करून कर्ज प्रकरणासाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.या प्रकरणी मल्हारपेठ पोलिसांनी भाजप पाटण तालुका युवा मोर्चाचा अध्यक्ष अमोल माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ग्रामपंचायतीची फसवणूक केल्याची तक्रार राजू कदम यांनी दिली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
शासकीय यंत्रणेचे बनावट शिक्के तयार करून अशी फसवणूक एका राजकीय पदाधिकाऱ्याने केल्याचे उघडकीस आल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या प्रकरणात अमोल माने याने आणखी कुठे अशा प्रकारे बनावट कागदपत्रांचा वापर केला आहे का, तसेच यात आणखी कोणाचा हात आहे का, याचा सखोल तपास मल्हारपेठ पोलीस करत आहेत.
अमोल माने हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका भारतीय जनता युवा मोर्चाचे (BJYM) अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ते या भागात भारतीय जनता पार्टी (BJP) आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून विविध राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांचे नेतृत्व करतात. पाटण मतदारसंघातील युवा पिढीला पक्षाशी जोडणे, विविध सामाजिक आणि राजकीय आंदोलने तसेच पक्षाचे उपक्रम तालुक्यात राबवणे यामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्याशिवाय पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महायुतीच्या स्थानिक नेत्यांसोबत समन्वय साधून संघटनात्मक पातळीवर ते सातत्याने कार्यरत असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.