Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांत, तर मराठवाड्यात नांदेड, हिंगोली आणि परभणीत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज
Maharashtra Weather UpdateSaam Tv
Published On

Maharashtra rain forecast from today : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उकाडा आणि उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. पण आता शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कुठे कसा राहील आज पाऊस?

आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव जास्त दिसून येईल. नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच हिंगोली, नांदेड आणि परभणी या मराठवाड्यातील जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज
Accident : हायवेवर काळाचा भीषण घाला! नागपूरला जाणाऱ्या ट्रकचा भयानक अपघात; ८ जणांचा जागीच दुर्दैवी अंत

नाशिकचा घाटमाथा, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली भागात आकाश ढगाळ राहील आणि मधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील.

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज
Traffic challan: गाडीवर दंड आहे? 12 सप्टेंबरला मिळणार मोठी सूट; कमी पैशांत भरता येणार ई-चलान

पाऊस अचानक का वाढतोय?

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे आणि कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. आजपासून सुरू होणारा हा पाऊस पुढील ३ दिवस राहण्याची शक्यता आहे. वीकेंडला राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार असून शेतीकामांनाही वेग येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com