Accident : हायवेवर काळाचा भीषण घाला! नागपूरला जाणाऱ्या ट्रकचा भयानक अपघात; ८ जणांचा जागीच दुर्दैवी अंत

Bhandara Truck Accident : भंडारा जिल्ह्यातील लाखनी-साकोली तालुक्यात पिंपळगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण ट्रक अपघात झाला. या दुर्घटनेत छत्तीसगडमधील आठ मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून, गंभीर जखमींना भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Bhandara Truck Accident
Bhandara Truck AccidentSaam TV
Published On: 

शुबम देशमुख, भंडारा प्रतिनिधी

पोळ्याच्या पाडव्याच्या दिवशी भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी दुर्घटना समोर आली आहे. नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर लाखनी तालुक्यातील पिंपळगाव (सडक) येथे भीषण अपघात झाला. भरधाव पिकअप आणि ट्रकच्या धडकेत ८ मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील सर्व मृत व जखमी मजूर हे छत्तीसगड राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास साकोली-लाखनी राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव परिसरातील 'भाऊ ढाब्या'जवळ हा अपघात झाला. महामार्गालगतच्या एका पेट्रोल पंपावरून इंधन भरून एक ट्रक नागपूरच्या दिशेने बाहेर पडत होता; त्याच वेळी पाठीमागून अत्यंत वेगाने येणाऱ्या एका पिकअप वाहनाने या ट्रकला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, पिकअप वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. या पिकअपमधून सुमारे ११ ते १२ मजूर प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता प्रचंड असल्याने वाहनातील ८ मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले.

Bhandara Truck Accident
Manoj Jarange : मनोज जरांगेंवर ₹१,००० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, ED कडे तक्रार दाखल

अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पिकअपच्या पत्र्यात अडकलेले मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागली. सर्व गंभीर जखमींना तातडीने उपचारासाठी भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रोजीरोटीच्या शोधात छत्तीसगडवरून आलेल्या या मजुरांवर सणाच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. मजुरांच्या या अचानक झालेल्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Bhandara Truck Accident
साताऱ्यात खळबळजनक प्रकार! भाजपच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे किंवा अतिवेगामुळे हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पिकअपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते का आणि अपघाताचे नेमके कारण काय, याचा सखोल तपास महामार्ग पोलीस करत आहेत. या भीषण अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांचा वेग आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com