Manoj Jarange : मनोज जरांगेंवर ₹१,००० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, ED कडे तक्रार दाखल

Manoj Jarange ₹1000 crore corruption allegation : मनोज जरांगे यांच्यावर १,००० कोटींच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मराठा कार्यकर्ते अजय बारस्कर यांनी जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल केल्याचा दावा केला आहे. जमीन
Manoj Jarange ₹1000 crore corruption allegation
Manoj Jarange ₹1000 crore corruption allegationSaam TV
Published On

Manoj Jarange corruption allegation : मराठा कार्यकर्ते अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे हे खरातसारखे असून जरांगे यांची संपत्ती उघड झाल्यास मराठा समाजच त्यांना सोडणार नाही, असा इशारा बारस्करांनी दिलाय. मनोज जरांगे यांच्यावर बारस्कर यांनी १००० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. बारस्कर यांनी याबाबत ईडीकडे तक्रार केली आहे. त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

१५ दिवसांपूर्वी ED (अमलबजावणी संचालनालय) कडे मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आंदोलनाच्या नावाखाली जरांगे यांच्या जवळच्या लोकांनी प्रचंड अवैध माया जमवली आहे. पांडुरंग तारक यांच्याकडे आधी फक्त १० गुंठे जमीन होती, त्यांच्याकडे आता ५० एकर जमीन आहे. त्यांनी जालना (अंतरवली) आणि छत्रपती संभाजीनगर येथे कोट्यवधी रुपयांच्या जमिनी खरेदी केल्या आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

बद्रीनाथ तारक, स्वप्नील तारक, गंगाधर काळकुटे, किशोर बलांडे, संजय कटारे, विलास खेडकर आणि श्रीराम कुरणकर या सहकाऱ्यांच्या राहणीमानात आणि संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे, असा आरोप बारस्कर यांनी केला.

'बंद दाराआड' चर्चा आणि सेटिंगचे आरोप

जरांगे आधी "मी ओपन चर्चा करतो, बंद खोलीत चर्चा करत नाही" असे म्हणायचे, मात्र नंतर त्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत बंद दाराआड चर्चा आणि सेटिंग केली. अशोक चव्हाण, उदय सामंत, संदीपान भुमरे, अजित पवार, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांसारख्या नेत्यांसोबत त्यांनी बंद खोलीत नेमकी काय चर्चा केली, हे त्यांनी स्पष्ट करावे असे आव्हान बारस्कर यांनी दिले.

Manoj Jarange ₹1000 crore corruption allegation
मोठी बातमी: सणासुदीत महाप्रसाद, भंडाऱ्याचे आयोजन करताय? परवानगी कशी घ्याल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

"मनोज जरांगे हे सामाजिक खरात बाबा आहेत"

ज्याप्रमाणे कॅप्टन अशोक खरात (खरात बाबा) यांच्या पाया पडायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री जायचे आणि नंतर त्यांचे बिंग फुटून ते जेलमध्ये गेले, तसेच मनोज जरांगे हे सामाजिक खरात बाबा आहेत. जरांगे हे उपोषणाचे नाटक करून मराठा समाजाला फसवतात आणि लोकांना भुलवतात, असा आरोप त्यांनी केला.

उपोषण आणि 'ग्लुकोनडी' प्रकरण

जरांगे यांच्या आंदोलनाला आता 'उपोषणाचे व्यसन' लागले आहे. जरांगे उपोषणाच्या नावाखाली सलाईन लावून ग्लुकोनडी पितात.

त्यांनी आता अधिकृतपणे उपोषण सोडावे, मात्र ते उपोषणाचा मांडव सोडू शकत नाहीत, असे बारस्कर म्हणाले.

अंतरवलीमध्ये २ सप्टेंबरला 'जिंकलो रे राजा' अशी घोषणा देऊन जरांगे यांनी मराठा समाजाला गुमराह केले. हैदराबाद गॅझेटचा जीआर आणि 'सगेसोयरे' या मुद्द्यांवरून त्यांनी मराठा समाजाची, विशेषतः महिलांची फसवणूक केल्याचे ते म्हणाले.

Manoj Jarange ₹1000 crore corruption allegation
साताऱ्यात खळबळजनक प्रकार! भाजपच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

महागड्या गाड्या आणि 'गरजवंत मराठा'

मराठा आंदोलनात ३५० पेक्षा जास्त तरुणांचे बळी गेले आहेत, अशा परिस्थितीत २ कोटींची डिफेंडर (Defender) गाडी वापरताना जरांगे यांच्या मनाला काहीच वाटले नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आंदोलनात जरांगे यांच्यासोबत एकही खरा 'गरजवंत मराठा' नसून सगळे वाळू चोर व कॉन्ट्रॅक्टर गोळा झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com