how to get permission for mahaprasad in Maharashtra : सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम, यात्रा, उरूस किंवा सार्वजनिक सोहळ्यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसाद, अन्नछत्र, लंगर आणि भंडारा यांसारख्या सामूहिक अन्नवाटप कार्यक्रमांबाबत FDA महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अशा कार्यक्रमांमध्ये अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने नियमावली जाहीर केली. आता आयोजकांना कार्यक्रमाच्या किमान ७ दिवस अगोदर प्रशासनाला पूर्वसूचना देऊन परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
परवानगी (पूर्वसूचना) कशी आणि कुठे मिळवाल?
अन्न व औषध प्रशासनाच्या https://complaints.mahafda.in किवा https://complaints.mahafda.in या अधिकृत पोर्टलवर जावे.
या पोर्टलवर "सामूहिक अन्नवाटप पूर्वसूचना नमुना" (Mass Food Distribution Notification Form) उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या किमान ७ दिवस अगोदर हा अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
परवानाधारक किंवा नोंदणीकृत केटरर, स्वयंपाकघर किंवा संस्थांमार्फत जिथे जिथे सामूहिक अन्न तयार करून वितरित केले जाते, त्या सर्वांना ही माहिती देणे अनिवार्य राहील.
'या' नियमांचे पालन करणे गरजेचे:
अन्न शिजवताना आणि वाटताना पूर्ण स्वच्छता व केवळ पिण्यायोग्य सुरक्षित पाण्याचा वापर करावा.
शिजवलेले अन्न योग्य तापमानावर साठवावे.
कच्चे अन्नपदार्थ आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवू नये (Cross-contamination रोखण्यासाठी).
अन्न हाताळणाऱ्या आचारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता बाळगणे अनिवार्य आहे.
प्रशासनाकडून अचानक तपासणी होणार
आयोजकांनी पोर्टलवर दिलेली पूर्वसूचना प्राप्त झाल्यानंतर, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी संबंधित ठिकाणी जाऊन अचानक तपासणी करू शकतात. गरजेनुसार अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेतले जातील आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल.
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत काही तक्रार किंवा गैरप्रकार आढळल्यास नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक 1800 222 365 वर संपर्क साधावा. अथवा https://complaints.mahafda.in किंवा https://complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.