Shocking : गडचिरोली हादरली! डॉक्टरचा काळा चेहरा समोर; लग्नाचं वचन देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

Gadchiroli Crime News : गडचिरोली जिल्ह्यात लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
GADCHIROLI DOCTOR ARRESTED FOR ALLEGED SEXUAL EXPLOITATION ON PROMISE OF MARRIAGE
GADCHIROLI DOCTOR ARRESTED FOR ALLEGED SEXUAL EXPLOITATION ON PROMISE OF MARRIAGEsaam tv
Published On
Summary
  • गडचिरोलीत एका डॉक्टरने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केले

  • पीडित तरुणीने डॉक्टरने विवाहाचे आश्वासन देऊन संबंध ठेवल्याचा आरोप केला

  • पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आरोपीला अटक केली

  • न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली

  • प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहेत

गणेश शिंगाडे, गडचिरोली

गडचिरोलीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आश्वासन देऊन एका तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आष्टी येथील एका डॉक्टरविरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आष्टी येथील डॉक्टर विजन प्रधान सरकार याने संबंधित तरुणीशी विवाह करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून तरुणीने त्याच्याशी संबंध ठेवले. मात्र, कालांतराने डॉक्टरने लग्न करण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर त्याने लग्नाला नकार दिल्याचा आरोप पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे. पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेत घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तक्रारीच्या आधारे आरोपी डॉक्टरविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

GADCHIROLI DOCTOR ARRESTED FOR ALLEGED SEXUAL EXPLOITATION ON PROMISE OF MARRIAGE
Monsoon Update : मान्सूनच्या वाटेत नवं संकट! मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून कधी व्यापणार? हवामान विभागाने सांगितली तारीख

पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे. न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या प्रकरणात पीडित तरुणीने डॉक्टरने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर दिलेले आश्वासन मोडल्याचा गंभीर आरोप केला आहे.

GADCHIROLI DOCTOR ARRESTED FOR ALLEGED SEXUAL EXPLOITATION ON PROMISE OF MARRIAGE
Skin Care : घामामुळे तुमच्याही अंगाला सतत खाज येते? 'हे' ५ घरगुती उपाय नक्की करा

पोलिसांनी तक्रारीची दखल घेत सखोल तपास सुरू केला असून घटनेशी संबंधित सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच आणखी एक गंभीर प्रकरण समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करत असून तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com