Alisha Khedekar
उन्हाळ्यात तुम्हाला देखील घामाने शरीराला खाज येते का? तसे असल्यास स्वछ कपडे घाला, ओलसरपणा टाळा
कोरफड जेल त्वचेची जळजळ कमी करते. 15-20 मिनिटे लावल्यास घामोळ्यांमुळे होणारी खाज आणि लालसरपणा कमी होण्यास मदत होते.
चंदन आणि गुलाबजलाची पेस्ट त्वचेला थंडावा देते. यामुळे घामोळ्यांमुळे होणारी जळजळ कमी होऊन त्वचेला आराम मिळतो.
घामोळ्यांमुळे त्वचा कोरडी पडल्यास थंड पाण्याने अंघोळ करा.
कडुलिंबाच्या पाण्याने त्वचा स्वच्छ केल्यास संसर्गाचा धोका कमी होतो.
उन्हाळ्यात सैल आणि सुती कपडे वापरा. घट्ट कपडे घातल्याने त्वचेच्या आजारांना आमंत्रण मिळते.
घामाने भिजलेले कपडे दीर्घकाळ घालू नका. शक्य तितक्या लवकर सुकलेले कपडे घाला आणि नीटनेटके राहा.
घामोळे सामान्य वाटत असले तरी त्यावर वेळेत उपाय करणे महत्त्वाचे आहे.