Mhauli Ghat Road: माऊली घाटातून पंढरीचा मार्ग सुकर! ३१ वर्षांची प्रतीक्षा संपणार, वारकऱ्यांसाठी नवा रस्ता होणार तयार

Konkan Western Maharashtra connectivity: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या माऊली घाटमार्गाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. भांबेड ते गावडी या 10 किलोमीटर रस्त्याला मंजुरी मिळाल्यास कोल्हापूर-लांजा प्रवासाचे अंतर 25 ते 30 किलोमीटरने कमी होण्याची शक्यता आहे.
Mhauli Ghat Road
Mhauli Ghat Roadsaam tv
Published On: 

कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी आणखी एक जवळचा मार्ग तयार होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड ते कोल्हापूर जिल्ह्यातील गावडी या माऊली घाटमार्गाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय. गेल्या 31 वर्षांपासून वारकऱ्यांकडून या रस्त्याची मागणी केली जात होती. आता या मार्गासाठी हालचाली सुरू झाल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कार्तिकी एकादशीनिमित्त लांजा तालुक्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना या नव्या मार्गाचा फायदा होणार आहे. शिवसेनेचे नेते आणि राजापूर-लांजा मतदारसंघाचे आमदार किरणभैया सामंत यांच्या प्रयत्नांमुळे या रस्त्याच्या कामाला गती मिळाली आहे. आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत पायी दिंडीचे प्रस्थानही झाले.

Mhauli Ghat Road
Fridge Vastu: देव्हाऱ्याच्या बाजूला फ्रिज ठेवणं अशुभ? फ्रीजजवळ कोणत्या गोष्टी ठेऊ नयेत, वास्तुशास्त्रात सांगितलेत नियम

आतापर्यंत पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना या मार्गावर अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्ता नसल्यामुळे दरवर्षी त्यांना गैरसोयी सहन कराव्या लागत होत्या. पण आता या दिंडीसाठी हक्काचा रस्ता मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा पायी प्रवास अधिक सोपा होऊ शकतो.

10 किलोमीटरच्या घाटरस्त्याचा डीपीआर तयार होणार

लांजा तालुक्यातील भांबेड धनगरवाडी ते कोल्हापूर जिल्ह्यातील गावडी असा हा घाटमार्ग आहे. या रस्त्याची एकूण लांबी 10 किलोमीटर आहे. सध्या हा रस्ता जिल्हा ग्रामीण मार्ग म्हणून ओळखला जातो. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे.

या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. या 10 किलोमीटरच्या रस्त्यापैकी सहा किलोमीटरचा घाट नव्याने दुरुस्त करावा लागणार आहे. त्यासाठी संपूर्ण माऊली घाटमार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे.

Mhauli Ghat Road
Diwali firecracker accident: फटाके फोडताना अचानक २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पोलिसांकडून अधिक तपास सुरु

याशिवाय दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील शेंबवणे ते शाहूवाडी हा या मार्गाचा पुढील रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील या भागातील रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे. आता रत्नागिरी जिल्ह्यातील माऊली घाटातील 10 किलोमीटरच्या रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळून प्रस्ताव मंजूर झाल्यास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा नवा जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे.

कोल्हापूर ते लांजा अंतर 25 ते 30 किलोमीटरने कमी होणार

माऊली घाटमार्ग सुरू झाल्यास कोल्हापूर ते लांजा या प्रवासाचं अंतर तब्बल 25 ते 30 किलोमीटरने कमी होऊ शकते. यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू आणि आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी विशेष लक्ष घातलंय. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mhauli Ghat Road
IND vs AFG: सेहवागच्या खेळीसमोर अफगाणिस्तान गार; फायनलमध्ये भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने

पर्यटन आणि शेती व्यवसायालाही फायदा

या नव्या घाटरस्त्यामुळे केवळ वारकऱ्यांचाच प्रवास सोपा होणार नाही, तर परिसराच्या विकासालाही चालना मिळू शकते. या मार्गामुळे पर्यटन व्यवसाय आणि शेती व्यवसायाला नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच अणुस्कुरा घाटाला हा मार्ग जवळचा आणि पर्यायी रस्ता ठरू शकतो. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासासाठी आणखी एक सोयीचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.