Fridge Vastu: देव्हाऱ्याच्या बाजूला फ्रिज ठेवणं अशुभ? फ्रीजजवळ कोणत्या गोष्टी ठेऊ नयेत, वास्तुशास्त्रात सांगितलेत नियम

Refrigerator Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार फ्रिजजवळ काही वस्तू ठेवणं टाळावं असं मानलं जातं. मायक्रोवेव्ह, कचऱ्याचा डबा, औषधांचे डबे आणि आरसा यांसारख्या वस्तू फ्रिजजवळ ठेवाव्यात का? जाणून घ्या फ्रिज ठेवण्याची योग्य दिशा आणि वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम.
Fridge Vastu
Fridge Vastusaam tv
Published On: 

आजकाल प्रत्येक घरात फ्रिज असतो. दूध, भाजीपाला, फळे आणि शिजवलेलं अन्न ताजं ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. पण फ्रिजचा संबंध केवळ अन्नपदार्थ थंड ठेवण्यापुरता मर्यादित नाही, असं वास्तुशास्त्रात मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, घरात फ्रिज कुठे ठेवला आहे आणि त्याच्या आजूबाजूला कोणत्या वस्तू ठेवल्या आहेत, याचाही घरातील वातावरणावर परिणाम होऊ शकतो.

अनेकदा जागेच्या कमतरतेमुळे आपण फ्रिजच्या वर किंवा बाजूला वेगवेगळ्या वस्तू ठेवतो. पण वास्तुशास्त्रानुसार, यातील काही गोष्टी घरासाठी योग्य मानल्या जात नाहीत. त्यामुळे घरात सुख-शांती आणि समृद्धी टिकवून ठेवायची असेल तर फ्रिजजवळ कोणत्या गोष्टी ठेवणं टाळावं, हे जाणून घेऊया.

फ्रिजच्या वर इलेक्ट्रिक वस्तू ठेवू नका

अनेक घरांमध्ये जागा वाचवण्यासाठी फ्रिजच्या वर किंवा अगदी बाजूला मायक्रोवेव्ह, ओव्हन किंवा टोस्टर ठेवला जातो. मात्र वास्तुशास्त्रानुसार असं करणं योग्य मानलं जात नाही. फ्रिज हा थंडाव्याचे, म्हणजेच जलतत्त्वाचे प्रतीक मानला जातो. तर ओव्हन आणि टोस्टर या गरम वस्तू अग्नितत्त्वाशी संबंधित आहेत.

फ्रिजजवळ कचऱ्याचा डबा

फ्रिजच्या अगदी बाजूला कचऱ्याचा डबा किंवा झाडू ठेवणं टाळावं. वास्तुशास्त्रानुसार या वस्तूंमुळे फ्रिजजवळ नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. याचा परिणाम घरातील वातावरणासोबतच अन्नपदार्थांवरही होतो, असं मानलं जातं. त्यामुळे फ्रिज आणि कचऱ्याचा डबा यांच्यामध्ये योग्य अंतर ठेवावे.

Fridge Vastu
Washing Machine Tips: वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी गरम पाणी वापरावं का?

सिंकसमोर फ्रिज ठेवणं टाळा

भांडी धुण्याचा सिंक आणि फ्रिज एकमेकांच्या अगदी समोर किंवा शेजारी ठेवू नयेत, असं वास्तुशास्त्र नमूद करण्यात आलंय. फ्रिज हा पृथ्वी आणि वायू या तत्त्वांशी संबंधित मानला जातो. तर सिंक हे जलतत्त्वाचे प्रतीक आहे. या दोन्ही गोष्टी सतत समोरासमोर असल्यास घरातील खर्च वाढू शकतो, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे.

फ्रिजजवळ औषधांचे डबे ठेवू नका

अनेकदा औषधांचे डबे ठेवण्यासाठी फ्रिजच्या वरची किंवा बाजूची जागा वापरली जाते. मात्र वास्तुशास्त्रानुसार असं करणं टाळावं. फ्रिजच्या वर किंवा अगदी बाजूला औषधांचे डबे ठेवल्याने घरात आजारपण वाढू शकते.

फ्रिजसमोर किंवा दरवाजावर आरसा लावू नका

फ्रिजच्या दरवाजावर किंवा त्याच्या अगदी समोर मोठा आरसा लावणं टाळावं. वास्तुशास्त्रानुसार, आरशात फ्रिजचं प्रतिबिंब दिसल्याने घरातील ऊर्जा दुप्पट होते. पण यामुळे काही वेळा घरातील सदस्यांना अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे फ्रिजसमोर किंवा त्याच्या दरवाजावर मोठा आरसा लावू नये, असं सांगितलं जातं.

Fridge Vastu
Vastu Tips for Laundry: घरात वाद आणि पैशांच्या अडचणीचं कारण आहे ओले कपडे; 'या' वेळी चुकूनही घरात कपडे धुवू नका

फ्रिजजवळ जड फर्निचर आणि भंगार ठेवू नका

फ्रिजच्या आजूबाजूला खूप जड फर्निचर किंवा नको असलेल्या वस्तूंचा ढीग करू नये. फ्रिजभोवती मोकळी जागा असणं गरजेचं आहे. त्याच्या आजूबाजूला खूप सामान ठेवल्यास नकारात्मक ऊर्जेचे वातावरण तयार होतं, असं वास्तुशास्त्रात मानलं जातं. त्यामुळे फ्रिजच्या भोवती स्वच्छता आणि मोकळी जागा ठेवावी.

देवघराच्या भिंतीला लागून फ्रिज ठेवू नका

घरातील ज्या भिंतीच्या दुसऱ्या बाजूला देवघर आहे त्या भिंतीला लागून फ्रिज ठेवणं टाळावं. फ्रिज सतत सुरू असल्यामुळे त्यातून आवाज आणि कंपन निर्माण होतात. यामुळे देवघरातील शांतता आणि पवित्रतेवर परिणाम होऊ शकतो, असं वास्तुशास्त्रानुसार मानलं जातं.

Fridge Vastu
Vastu Tips for Laundry: घरात वाद आणि पैशांच्या अडचणीचं कारण आहे ओले कपडे; 'या' वेळी चुकूनही घरात कपडे धुवू नका

वास्तुशास्त्रानुसार, घरात फ्रिज ठेवण्यासाठी उत्तर किंवा पश्चिम दिशा योग्य मानली जाते. पण काही घरांमध्ये जागेच्या कमतरतेमुळे फ्रिज दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावा लागतो. अशा वेळी फ्रिजच्या खाली लाकडाचा छोटा स्टँड ठेवावा. यामुळे वास्तुदोष कमी होण्यास मदत होते.

Fridge Vastu
Vastu Tips for Laundry: घरात वाद आणि पैशांच्या अडचणीचं कारण आहे ओले कपडे; 'या' वेळी चुकूनही घरात कपडे धुवू नका

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.