Vastu Tips for Laundry: घरात वाद आणि पैशांच्या अडचणीचं कारण आहे ओले कपडे; 'या' वेळी चुकूनही घरात कपडे धुवू नका

Washing Clothes at Night: वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणं आणि उघड्यावर वाळत घालणं अशुभ मानलं जातं. कपडे धुण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे? गुरुवारी कपडे धुणं का टाळावं? जाणून घ्या कपडे धुण्याचे महत्त्वाचे वास्तुशास्त्रीय नियम आणि त्यामागील मान्यता.
Vastu Tips for Laundry
Vastu Tips for Laundrysaam tv
Published On: 

वास्तुशास्त्रात घरातील अनेक गोष्टींबाबत काही नियम सांगण्यात आलंय. या नियमांचा संबंध घरातील सकारात्मक आणि नकारात्मक वातावरणाशी जोडला जातो. आपण रोज कपडे धुतो. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा ते वाळत घालतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार कपडे धुण्याची आणि वाळत घालण्याचीही एक योग्य वेळ असते. रात्री कपडे धुणं आणि उघड्यावर वाळत घालणं शुभ मानलं जात नाही. यामुळे घरात नकारात्मकता वाढू शकते, असं वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आलं आहे.

कपडे धुण्याच्या काही नियमांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होऊ शकतो. त्यामुळे कपडे धुताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? रात्री कपडे धुणं का टाळावं याबाबत वास्तुशास्त्रातील काही नियम सांगितले आहेत.

Vastu Tips for Laundry
Kitchen knife direction: स्वयंपाकघरात चाकू कोणत्या दिशेला ठेवावा? चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास येईल आर्थिक तंगी, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

रात्री कपडे धुणं आणि वाळत घालणं अशुभ

वास्तुशास्त्रानुसार, रात्री कपडे धुणं टाळावं. रात्री धुतलेले कपडे घराबाहेर मोकळ्या जागेत किंवा आकाशाखाली वाळत घातल्यास त्यांच्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो, असं मानलं जातं. हेच कपडे सकाळी घातल्यास त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो.

यामुळे कामात अडथळे येतात. मन अस्वस्थ राहतं आणि तणाव वाढू शकतो, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. काही कारणांमुळे रात्री कपडे धुणं गरजेचं असेल तर ते उघड्या जागेत वाळत घालू नयेत. कारण मोकळ्या जागेत ठेवलेल्या कपड्यांवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जाते.

Vastu Tips for Laundry
Vastu Shastra: दररोज नकळत तुमच्याकडून होतायत या 4 चुका; घरात येते नकारात्मकता, वास्तुशास्त्राचे नियम वाचा

दिवसा कपडे धुणं आणि वाळत घालणं शुभ

वास्तुशास्त्रानुसार, कपडे धुण्यासाठी सकाळची किंवा दुपारची वेळ योग्य मानली जाते. दिवसा कपडे धुऊन उन्हात वाळत घातल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, अशी मान्यता आहे. सूर्याच्या किरणांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते, असं वास्तुशास्त्र सांगते. त्यामुळे उन्हात कपडे वाळवल्याने त्यांच्यातील नकारात्मकता कमी होते. त्याचप्रमाणे कपड्यांवरील हानिकारक जंतूही नष्ट होण्यास मदत होते.

कपडे धुण्यासाठी कोणता दिवस योग्य?

वास्तुशास्त्रानुसार, आठवड्यातील कोणताही एक दिवस कपडे धुण्यासाठी ठरवू शकता. परंतु गुरुवारी कपडे धुणं टाळावं, असं सांगितलं जातं.

गुरुवारी कपडे धुणं, घरातील जुने सामान किंवा भंगार बाहेर टाकणं तसंच झाडू-पोछा करणं शुभ मानलं जात नाही. या दिवशी अशी कामं केल्याने घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे.

Vastu Tips for Laundry
Evening Diya Rules: दररोज संध्याकाळी घरी दिवा लावताय ना? नकळत होणाऱ्या या चुका टाळा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.