IND vs AFG: सेहवागने गेम फिरवला; अफगाणिस्तानला नमवत टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

U19 Asia Cup 2026: अंडर-19 आशिया कप 2026 च्या उपांत्य फेरीत भारताने अफगाणिस्तानचा 8 विकेट्सने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. लक्ष्य रायचंदानीच्या 93 धावा, आर्यवीर सहवागचे अर्धशतक आणि विनीतच्या नाबाद 57 रन्सच्या जोरावर भारताने विजय मिळवला. आता पाकिस्तानशी विजेतेपदासाठी लढत होणार आहे.
U19 Asia Cup 2026
U19 Asia Cup 2026saam tv
Published On: 

अंडर-19 आशिया कप 2026 मध्ये टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारलीये. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 8 विकेट्सने पराभव केला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावत 227 रन्स केले होते. भारताने हे आव्हान फक्त २ विकेट्स गमावून पूर्ण केलंय. या विजयासह टीम इंडियाने अंतिम सामन्याचे तिकीट मिळवलंय. आता विजेतेपदासाठी भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.

लक्ष्य रायचंदानीची शानदार खेळी

अफगाणिस्तानने दिलेल्या 228 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भारताकडून कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानी याने सर्वाधिक 93 रन्स केले. त्याने त्याच्या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याच्यासोबत आर्यवीर सहवाग आणि व्ही. के. विनीत यांनीही अर्धशतकं झळकावलीयेत. आर्यवीरने 51 रन्सती खेळी केली तर विनीतने नाबाद 57 रन्स केले. केल्या. या फलंदाजांच्या जोरावर भारताने विजय सहज मिळवला.

U19 Asia Cup 2026
रोहित शर्मा २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार की नाही? हिटमॅनने स्पष्टच सांगून टाकलं,गिलच्या कॅप्टनशीपवरही भाष्य

लीग सामने जिंकून टीम इंडियाने गाठली सेमीफायनल

कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानी याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने साखळी फेरीतील तीनपैकी दोन सामने जिंकले. पहिल्या सामन्यात भारताने नेपाळचा 10 विकेट्सने पराभव केला होता. पण दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानकडून भारताला 3 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर शेवटच्या साखळी सामन्यात भारताने यूएईला 70 रन्सने हरवलं. या विजयामुळे भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

U19 Asia Cup 2026
ICC Ranking : टी २० मध्ये टीम इंडियाचा धमाका; कर्णधार टॉप ५ मध्ये, दोघांमध्ये पहिल्या क्रमांकासाठी चढाओढ

तर दुसरीकडे अफगाणिस्तानने लीगमधील त्यांचे तिन्ही सामने जिंकले होते. त्यांनी बांगलादेश, मलेशिया आणि श्रीलंका या टीम्सना पराभूत करून सेमीफायलन गाठली होती.

पाकिस्ताननेही गाठली अंतिम फेरी

भारतापूर्वी पाकिस्तानच्या टीमनेही फायलनचं तिकीट पटकावलं होतं. पाकिस्तानने उपांत्य फेरीत बांगलादेशचा मोठ्या फरकाने पराभव करत विजेतेपदाच्या सामन्यात आपलं स्थान निश्चित केलंय. त्यामुळे आता अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम्स आमने-सामने येणार आहेत.

U19 Asia Cup 2026
Ind vs NZ : टीम इंडियाचा कॅप्टन बदलला; रोहित शर्माचा सलामीचा भिडू बदलणार, कशी असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन?

कधी आणि कुठे होणार भारत-पाकिस्तान सामना?

अंडर-19 आशिया कप 2026 चा अंतिम सामना शनिवारी 14 नोव्हेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे. ओमानमधील अल अमेरातमध्ये हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या अंतिम सामन्यात कोणाचा विजय होणार हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.