ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये बंडखोर गितेंचा विजय; पराभवानंतर दराडेंचा भाजपवर 'दगाफटक्याचा' आरोप

Nashik Vidhan Parishad Result 2026, Gokul Gite victory : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुतीचे नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. निकालानंतर दराडे गटाने महायुतीवर दगाफटक्याचा गंभीर आरोप केला असून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde saam tv
Published On

Nashik MLC election, Gokul Gite victory News : स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने १६ ठिकाणी एकतर्फी विजय मिळवला आहे. पण नाशिकमध्ये मात्र महायुतीला अत्यंत मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला आहे. नाशिक मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालानंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळात प्रचंड भूकंप झाला आहे. राज्यात एकीकडे ऑफरेशन टायगर यशस्वी झाले असतानाच एकनाथ शिंदेंना मात्र दुसरीकडे मोठा धक्का बसला आहे. नाशिकमधील पराभवानंतर एकनाथ शिंदे संतापले असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक मतदारसंघाची अंतिम आकडेवारी:

एकूण मतदान: ६१८

  • वैध मते: ६०५ | अवैध मते: १३

  • विजयाचा कोटा: ३०३

  • गोकुळ गिते (अपक्ष): ३५७ मते (विजेते)

  • नरेंद्र दराडे (महायुती): २४८ मते

  • प्रसाद हिरे: ०० मते

Eknath Shinde
Vidhan Parishad Result 2026: महायुतीचा दणदणीत विजय, मविआची मते फुटली; सर्व १७ जागांचा संपूर्ण निकाल एकाच क्लिकवर

महायुतीतील अंतर्गत धुसफूस ठरली कारणीभूत

नाशिक विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत धुसफूस आणि नाराजी पाहायला मिळत होती. नरेंद्र दराडे यांना महायुतीकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने स्थानिक पातळीवर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांतील काही स्थानिक नेते व पदाधिकारी नाराज होते.

दुसरीकडे, अपक्ष उभे राहिलेल्या गोकुळ गिते यांनी पडद्यामागून अत्यंत तगडी फिल्डिंग लावली होती. महायुतीमधील याच अंतर्गत गटबाजीचा आणि नाराजीचा थेट फायदा उठवत गितेंनी महायुतीच्या मतांमध्ये मोठे खिंडार पाडले. मतमोजणीदरम्यान पहिल्या टेबलपासूनच गितेंनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि महायुतीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला.

महायुतीने दगाफटका केला - दराडेंचा गंभीर आरोप

निकाल हाती आल्यानंतर पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या गोटातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नरेंद्र दराडे यांचे बंधू तथा शिक्षक आमदार किशोर दराडे हे तातडीने मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. एकानंही युती धर्म पाळला नाही, गिरीश महाजन यांनी गीतेंना ताकद दिल्याचा आरोप नरेंद्र दराडे यांनी केला.

मुंबईला निघताना किशोर दराडे यांनी महायुतीवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. "महायुतीच्या पक्षांनी मिळून आमच्याशी दगाफटका केला आहे," असा थेट आरोप त्यांनी केला. नाशिकमधील स्थानिक नेत्यांनी पक्षादेश डावलून अपक्ष उमेदवाराला मदत केल्याची त्कार ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार असल्याचे समजते.

Eknath Shinde
Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा हाफ एन्काउंटर, पोलिसांनी दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

विजयी गोकुळ गितेंना विशेष विमानाने मुंबईचे बोलावणे

नाशिकमध्ये महायुतीचा पराभव झालेला असला, तरी अपक्ष विजयी झालेल्या गोकुळ गिते यांना महायुतीत खेचण्यासाठी पडद्यामागे वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. निकाल जाहीर होताच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विजयी उमेदवार गोकुळ गिते यांना थेट फोन केला. मंत्री सामंत यांच्या फोननंतर गोकुळ गिते यांच्यासाठी विशेष विमान (Special Flight) नाशिकला पाठवण्यात आले असून, त्यांना तातडीने मुंबईला पाचारण करण्यात आले आहे. मुंबईत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची विश्वासनीय माहिती आहे. त्यामुळे निवडणुकीत पराभूत करूनही महायुती आता अपक्ष गितेंना आपल्या गोटात सामील करून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

Eknath Shinde
Ladki Bahin Yojana : महिना संपायला अवघे ८ दिवस बाकी; जूनचा हप्ता कधी जमा होणार? लाभार्थी महिलांमध्ये ₹१५०० ची उत्सुकता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com