अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवल्याची घटना समोर आली आहे. पीडितेवर बलात्कार करून फरार झालेल्या आरोपीचा पोलिसांनी थरारक पाठलाग केला. यादरम्यान आरोपीने पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीच्या दोन्ही पायांवर गोळ्या लागल्या आहेत. पोलिसांनी या नराधमाला फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्या असून उत्तर प्रदेशमधील पुरमुफ्टी येथील या धडक कारवाईचे कौतुक होत आहे.
उत्तर प्रदेशमधील महिलांच्या सुरक्षेसाठी योगी सरकारकडून'मिशन शक्ती' मोहीम राबावली जात आहे. त्याअंतर्गत पोलिसांनी पुरमुफ्टी परिसरात कारवाई केली. आरोपींनी घरात घुसून त्या मुलीचे अपहरण केले. आरोपींने तिचे तोंड बांधून बलात्कार केला. नराधमांनी मुलीच्या पायावर पेटत्या सिगारेटने चटके दिल्याचेही धक्कादायक वास्तव समोर आले. तक्रार केल्यास तिला ठार मारण्याची धमकी देऊन, त्यांनी तिला बेशुद्ध अवस्थेत घराबाहेर सोडून दिले. सहा दिवस ती किशोरवयीन मुलगी आणि तिचे कुटुंब भीतीमध्ये होते.
रविवारी मुलगी आणि कुटुंबियांनी आरोपी मुशर्रफ आणि त्याच्या तीन अज्ञात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केली. मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत समजताच परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. गावकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींचा माग केला. मुख्य आरोपी मुशर्रफ याला रविवारी रात्री उशिरा फतेहपूर घाटाजवळ झालेल्या चकमकीत पोलिसांनी अटक केली. त्याच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या होत्या. एक पिस्तूल आणि काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. इतर आरोपींच्या शोधासाठी छापे टाकले जात आहेत.
आरोपी मुशर्रफ याने घरात कुणी नाही हे पाहून १४ तारखेला रात्री ११ वाजता मित्रांसोबत मुलीचे अपहरण केल्याचा आरोप वडिलांनी केला. आरोपीने मुलीला जबरदस्तीने बाहेर नेले, तिच्या तोंडाला पट्टी बांधली, तिच्यावर बलात्कार केला आणि पेटत्या सिगारेटने पायाला चटका दिला. तिने कोणाला सांगितल्यास तिच्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी त्याने दिली. मुशर्रफ आणि इतर आरोपींनी मुलीला घराबाहेर बेशुद्ध अवस्थेत सोडून पळ काढल्याचे तक्रारीत मुलीच्या वडिलांनी म्हटल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुलीची अवस्था पाहून तिची चौकशी केली असता, तिने संपूर्ण घटना सांगितली. मुलीवर झालेल्या अत्याचाराने संपूर्ण कुटुंब भयभीत झाले होते. त्यानंतर, रविवारी ते पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक न झाल्याने गावकऱ्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.