Vidhan Parishad Result 2026: महायुतीचा दणदणीत विजय, मविआची मते फुटली; सर्व १७ जागांचा संपूर्ण निकाल एकाच क्लिकवर

MLC Election Result : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ मध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला. अनेक ठिकाणी मविआची मते फुटल्याचे समोर आले असून १७ जागांचा संपूर्ण निकाल, विजयी उमेदवार आणि मताधिक्याची माहिती एका क्लिकवर वाचा
MAHARASHTRA MLC ELECTION
MAHARASHTRA MLC ELECTION Saam Tv
Published On

Vidhan Parishad Result 2026 : राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवलाय. आज ११ स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये सत्ताधारी महायुतीने एकतर्फी वर्चस्व गाजवत दणदणीत विजय मिळवला आहे. अनेक मतदारसंघांत महाविकास आघाडीची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याचे समोर आले आहे. तर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराने महायुतीला धक्का दिला आहे. कोणत्या मतदारसंघातून कोण जिंकले? कुणाला धक्का बसला? याबाबत जाणून घेऊयात..

भाजपचे डॉ. राजीव पोतदार विजयी (काँग्रेसची मते फुटली)

नागपूरमध्ये भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांचा ५५२ मतांच्या प्रचंड फरकाने पराभव केला. या निवडणुकीत महाविकास आघाडीची तब्बल ९९ मते फुटल्याची चर्चा आहे.

  • डॉ. राजीव पोतदार (भाजप): ६८२ मते

  • अतुल लोंढे (काँग्रेस): १३० मते (काँग्रेसच्या स्वतःच्या १६९ मतदारांपैकी त्यांना केवळ १३० मते मिळाली, म्हणजेच पक्षाची ३९ मते कमी झाली.)

  • अवैध मते: ११ | मतदान न केलेले: १३

बसवराज पाटील यांचा राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजय

धाराशिव-बीड-लातूर या मतदारसंघात भाजपच्या बसवराज पाटील यांनी काँग्रेसच्या महेश देशमुख यांना पराभवाची धूळ चारली. बसवराज पाटील यांनी ७२१ मतांचे राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेतले असण्याची शक्यता आहे. येथेही मविआच्या मतांना मोठा धक्का बसला.

  • बसवराज पाटील (भाजप): ८४५ मते

  • महेश देशमुख (काँग्रेस): १२४ मते

  • अवैध/कोऱ्या मतपत्रिका: १४

भाजपचे धैर्यशील कदम विजयी

अत्यंत चुरशीच्या आणि हाय-व्होल्टेज ठरलेल्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत अखेर महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा पराभव केला.

  • धैर्यशील कदम (भाजप): ५९३ मते (पहिली पसंती)

  • अभयसिंह जगताप (मविआ - शरद पवार गट): २९२ मते

  • विजायाचा फरक: ३०१ मतांनी धैर्यशील कदम विजयी.

  • एकूण मतदान: ८८५

महायुतीची १०० मते फुटल्याचा मविआचा दावा:

या निकालावर पराभूत उमेदवार अभयसिंह जगताप यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. महाविकास आघाडीकडे स्वतःची केवळ १९२ मते असताना त्यांना २९२ मते मिळाली आहेत. याचा अर्थ महायुतीची तब्बल १०० मते फुटली असून ती मते आपल्याला मिळाली आहेत, असा थेट दावा जगताप यांनी मतमोजणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

महायुतीचे नंदकिशोर महाजन एकतर्फी विजयी

जळगावमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी महाविकास आघाडीच्या शरद तायडे यांचा दारूण पराभव केला. अधिकृत घोषणेची केवळ औपचारिकता बाकी असून मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

  • नंदकिशोर महाजन (महायुती/भाजप): ५७७ हून अधिक मते

  • शरद तायडे (मविआ): केवळ ५ मते

  • एकूण मतदान: ६१६ (५ अवैध, ६११ वैध मते)

भाजपचे सुहास शिरसाठ विजयी

छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार सुहास त्र्यंबकराव शिरसाठ यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेत पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण केला. पराभूत उमेदवार गणेश लोखंडे यांनी 'मला मविआच्या संख्याबळापेक्षा (११९) जास्त मते मिळाल्याने मी समाधानी आहे' अशी प्रतिक्रिया दिली.

  • सुहास शिरसाठ (भाजप/महायुती): ४५५ मते (प्रथम पसंती)

  • गणेश लोखंडे (शिवसेना ठाकरे गट): १३५ मते

  • इसाक खान (अपक्ष/MIM पाठिंबा): ३५ मते

  • बाद मते: ५

MAHARASHTRA MLC ELECTION
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! ओमराजेंसह ६ बंडखोर खासदार आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

भाजपचे राजेंद्र राऊत यांचा मोठा विजय

सोलापूरमध्ये भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसंतराव देशमुख यांचा ३६५ मतांनी पराभव केला. राऊत यांच्या विजयानंतर सोलापुरात गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.

  • राजेंद्र राऊत (भाजप): ४८३ मते

  • वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी): ११८ मते

भाजपच्या अमरनाथ राजूरकर यांची 'हॅट्रिक'

नांदेडमध्ये भाजपचे अमरनाथ राजूरकर यांनी २५५ मतांचे मताधिक्य घेत दणदणीत विजय मिळवला. राजूरकर यांनी विधानपरिषदेत विजयाची हॅट्रिक केली असून कार्यकर्त्यांनी 'अशोक चव्हाण राजकारणातील धुरंदर' अशा आशयाचे बॅनर घेऊन ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला.

  • अमरनाथ राजूरकर (भाजप/महायुती): ३३९ मते

  • कृष्णा पाटील आष्टीकर (मविआ): ८४ मते

  • प्रशांत इंगोले (वंचित बहुजन आघाडी): ५ मते

  • एकूण मोजलेली मते: ४५१ (२३ मते बाद)

MAHARASHTRA MLC ELECTION
Crime : सोलापूर हादरले! शेतकरी नेत्यावर तलवारीने सपासप वार, स्कॉर्पिओमधून आले अन्...

भाजपचे अविनाश ब्राह्मणकर विजयी

भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावरील अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांचा १४८ मतांनी पराभव केला.

  • अविनाश ब्राह्मणकर (भाजप): ३०४ मते

  • नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा): १५२ मते

  • एकूण मतदान: ४५७ (१ मत अवैध)

शिवसेना महायुतीचे सईद खान विजयी

परभणी-हिंगोलीत शिवसेना महायुतीचे उमेदवार सईद खान पहिल्या पसंतीची मते घेऊन विजयी झाले. त्यांनी मविआचे विवेक नवंदर यांचा पराभव केला. "माझ्यासारख्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्याला एकनाथ शिंदे यांनी आमदार करून राज्याला वेगळा संदेश दिला आहे, परभणीला शिवसेनेचा बालेकिल्ला करू," अशी प्रतिक्रिया सईद खान यांनी दिली.

  • सईद खान (शिवसेना महायुती): २४२ मते (प्रथम पसंती)

  • विवेक नवंदर (मविआ): दुसऱ्या क्रमांकावर

महायुतीला धक्का, अपक्ष गिते विजयी

नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला असून अपक्ष उमेदवार गिते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला आहे. येथे विजयाचा कोटा ३०३ मतांचा होता.

  • गिते (अपक्ष): ३५७ मते

  • नरेंद्र दराडे (महायुती): २४८ मते

  • प्रसाद हिरे: ०० मते

  • एकूण मतदान: ६१८ (१३ अवैध, ६०५ वैध मते)

काँग्रेसचा दारुण पराभव; भाजपचे प्रवीण पोटे एकतर्फी मताधिक्याने विजयी

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. प्रवीण पोटे यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेत विजयाचा आवश्यक कोटा सहजरीत्या पूर्ण केला.

  • प्रवीण पोटे (भाजप): ३९० मते

  • निलेश विश्वकर्मा (वंचित बहुजन आघाडी): ३१ मते

  • हर्षजित देशमुख (काँग्रेस): ० (शून्य) मते

काँग्रेसला मोठा झटका, उमेदवाराला भोपळाही फोडता आला नाही!

या निवडणुकीत काँग्रेसला अत्यंत मानहानिकारक आणि दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख यांना या निवडणुकीत एकही मत (०) मिळाले नाही. काँग्रेसमध्ये अंतर्गत पातळीवर झालेला मोठा बेबनाव आणि पक्षाच्या भूमिकेमुळे काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटली असून, त्याचा थेट फायदा भाजपचे प्रवीण पोटे यांना झाल्याचे या एकतर्फी निकालावरून स्पष्ट होत आहे.

या 6 जागांवर बिनविरोध विजयी

  • पुणे: विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट)

  • अहिल्यानगर: प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट)

  • ठाणे: रवींद्र फाटक (शिवसेना - एकनाथ शिंदे गट)

  • कोकण: अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट)

  • यवतमाळ: दुष्यंत चतुर्वेदी (भारतीय जनता पक्ष)

  • वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर: अरुण लखाणी (भारतीय जनता पक्ष)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com