

नाशिकमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले
सुरगाणा तालुक्यात जमिनीला मोठ्या भेगा पडल्या
वारंवार भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. आज सायंकाळी ७:२३ वाजताच्या सुमारास हे धक्के जाणवल्या. अचानक जमिनीला भल्या मोठ्या भेगा पडल्या. तर घराच्या भिंती थरथरल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. (Nashik Earthquake: Tremors Shake Surgana, Large Cracks Appear In Farmlands)
गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात वारंवार असे सौम्य धक्के बसत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीची लहर पसरली आहे. भूकंपाने जमिनी हादरल्या, शेत जमिनींना भेगा पडल्या आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सुरगाणा तालुक्यातील बोरगाव आणि परिसरात सायंकाळच्या वेळी भूकंपाचे धक्के जाणवले. धक्के जाणवताच नागरिक भीतीपोटी घराबाहेर पडून उघड्या जागेवर जमा झाले.
या धक्क्यांची तीव्रता जरी सौम्य असली तरी गेल्या दोन दिवसांत लागोपाठ या घटना होत असल्यानं स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या सततच्या धक्क्यांमुळे परिसरातील काही शेतजमिनींना तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये अधिकच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मोठी वित्तहानी झालेली नाहीये. परंतु घरांचे किंवा इतर पायाभूत सुविधांचे कसलेही नुकसान झालेले नाही.
सुरगाणा तालुक्यातील या परिस्थितीवर स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. हा भूकंपाचा सौम्य धक्का असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.