दिल्लीत राजकीय खलबतं! खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शाहांची भेट; भेटीचं कारण काय?

Supriya Sule Meets Amit Shah In Delhi: नवी राजकीय समीकरणे जुळून येण्याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. त्याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली.
दिल्लीत राजकीय खलबतं! खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शाहांची भेट; भेटीचं कारण  काय?
Published On
Summary
  • सुप्रिया सुळे अमित शाह भेटीमागचे राजकीय कारण

  • शरद पवार गट एनडीएमध्ये जाणार का चर्चा

  • दिल्लीतील राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांची भेट

दिल्लीत राजकारणात खलबतं होताना दिसत आहेत. शरद पवार गट एनडीएमध्ये सामील होणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्याचदरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. सुप्रिया सुळेंच्या आधी अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांनी अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.

दिल्लीत राजकीय खलबतं! खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शाहांची भेट; भेटीचं कारण  काय?
युवा मतदार बदलणार निवडणुकांचं समीकरण; निवडणुकांची दोरी 'Gen Z'च्या हाती

त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे आणि अमित शाह यांच्या भेटीमागे काय राजकीय कारण आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. काही दिवसांपासून राज्यातील भाजप, शिंदे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची दिल्लीवारी वाढलीय. त्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झालंय. याआधी सुप्रिया सुळे आणि खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. एकीकडे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असतानाच ही भेट झाली होती. या भेटीचीही तेव्हा सगळीकडे चर्चा झाली होती. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांची भेट घेतलीय.

दिल्लीत राजकीय खलबतं! खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शाहांची भेट; भेटीचं कारण  काय?
काँग्रेसला मोठा धक्का! वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात ऑपरेशन लोट्सचा 'विजय'; नगराध्यक्षासह ९ नगरसवेकांचा भाजपमध्ये प्रवेश

नव्या विधेयकादरम्यान भेट

आज भाजपनं लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (अयोग्य मार्गांचा प्रतिबंध) विधेयक, २०२६ मांडण्यात आलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे विधेयक मांडत असताना विरोधकांनी गोंधळ सुरू केला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला होता, त्यावर सरकारनं उत्तर द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला होता. त्याचदरम्यान सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांची भेट घेतलीय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची दिल्लीवारी

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत बोलवण्यात आले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना शरद पवार गटाबाबत संदेश पाठवण्यात आलाय. रच शरद पवार यांची राष्ट्रवादी ही एनडीएत सहभागी होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com