काँग्रेसला मोठा धक्का! वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात ऑपरेशन लोट्सचा 'विजय'; नगराध्यक्षासह ९ नगरसवेकांचा भाजपमध्ये प्रवेश

Congress 9 Nagarsevak Join BJP: गडचिरोलीतील एका महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडलीय. धानोरा नगरपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर सात नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.
Congress 9 Nagarsevak Join  BJP
Congress Suffers Major Setback As 9 Councillors Join BjpSaam tv
Published On
Summary
  • विजय वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे ऑपरेशन लोट्स

  • गडचिरोलीत काँग्रेसच्या नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

  • धानोरा नगरपंचायतीतील मोठी राजकीय घडामोड

ठाकरेंचे सहा खासदारांनी बंड करत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची मोठी चर्चा झाली. ऑपरेशन टायगर चालूच असून ठाकरेंचे नगरसेवक लवकरच आपला पक्ष सोडणार अशी चर्चा दबक्यात आवाजात सुरू आहे. राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा असताना भाजपनं आलं ऑपरेशन लोट्स राबवलंय. तेही थेट विजय वडेट्टीवार यांच्या बाल्लेकिल्ल्यात.

Congress 9 Nagarsevak Join  BJP
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुढचा शिक्षणमंत्री कोण होणार? 'या' नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा

गडचिरोलीतल धारोना नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्षांसह तब्बल ९ नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम ठोकत थेट भाजपमध्ये प्रवेश केलाय. नागुपरात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा दिमाखात पार पडला. या मोठ्या राजकीय फेरबदलामुळे जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय समीकरणे बदलली आहेत. एकेकाळी काँग्रेसचा भक्कम गड मानल्या जाणाऱ्या धानोरा नगरपंचायतीवर भाजपनं आपलं ऑपरेशन लोट्स यशस्वी करत कमळ फुलवलंय.

धानोरा नगरपंचायत निवडणुकीमध्ये १७ पैकी १३ जागा जिंकत काँग्रेसनं एकहाती विजय मिळवला होता. विजय वडेट्टीवार यांच्या राजकीय करिष्मामुळे काँग्रेसनं हा विजय मिळवला होता. मात्र एकाचवेळी ९ नगरसेवक फुटल्यामुळे काँग्रेस पक्षला मोठा राजकीय धक्का बसलाय. या प्रवेशामुळे काँग्रेसकडे आता फक्त ४ नगरसेवक उरले आहेत. त्यामुळे धानोरा नगरपंचायतीवरील काँग्रेसची सत्ता गेली आहे.

नगराध्यक्षा पोर्णिमा सयाम यांच्या यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष ललित बरछासह भूषण उंदीरवाडे, माणिक मडावी, कालिदास मोहुर्ले, नरेश चिरमुरकर, सुषमाह भुरसे,सीमा कार्टेगे, यामिना पेंदाम, या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. या नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व नेत्यांचे स्वागत केले.

Congress 9 Nagarsevak Join  BJP
शिक्षणमंत्रिपद महाराष्ट्र्राला मिळणार? प्रधान यांच्या राजीमान्यानंतर राजकीय घडामोडींना वेग

भारतीय जनता पक्षाच्या विचारावर विश्वास ठेवून तुम्ही पक्षात प्रवेश केला. तुमचं मन: पूर्वक स्वागत करतो. पुढील सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. तुमच्या प्रवेशामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल आणि जनतेच्या विकासासाठी नव्या जोमाने कार्य करण्यासाठी बळ मिळेल, असा विश्वास बावनकुळे यांनी यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com