धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुढचा शिक्षणमंत्री कोण होणार? 'या' नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा

Who Will India’s Next Education Minister: NEET-UG परीक्षेतील अनियमितता आणि देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा राजीनामा स्वीकारल्यानंतर, आता नवीन शिक्षण मंत्री म्हणून कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Who will become India's next education minister after Dharmendra Pradhan
Who will become India's next education minister after Dharmendra Pradhan
Published On
Summary
  • पंतप्रधानांकडून राजीनामा स्वीकारल्यानंतर नवीन शिक्षणमंत्री कोण होणार

  • आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली.

  • विद्यार्थी आणि विरोधी पक्षांकडून परीक्षा व्यवस्थापनावर तीव्र टीका

NEET-UG परीक्षेतील अनियमितता, पेपरफुटीवरून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीसह देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन उभारलं होतं. आंदोलनाचा वाढता दबाव पाहता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. परीक्षेतील त्रुटींबाबत विरोधी पक्ष आणि विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या सततच्या टीकेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

Who will become India's next education minister after Dharmendra Pradhan
Abhijeet Dipke : ...तोपर्यंत इथून हटणार नाही; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही अभिजीत दिपके ठाम, स्टेजवरूनच केल्या २ मागण्या

या नेत्यांची नावे चर्चेत

सध्या तरी, नवीन शिक्षणमंत्री किंवा त्या खात्याच्या वाटपाबाबत राष्ट्रपती भवन किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु राजकीय वर्तुळात एखाद्या नवीन चेहऱ्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला बोलावले आहे.

अमित शाह यांचा निरोप मिळताच फडणवीस नागपूरहून दिल्लीकडे रवाना झालेत. त्यामुळे त्यांची शिक्षणमंत्रिपदी वर्णी लागू शकते असं म्हटलं जातंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही याप्रकरणी दावा केलाय. देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय शिक्षणमंत्री होतील असा दावा त्यांनी केलीय. प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आलंय, त्यावरून बोलताना संजय राऊत म्हणालेत.

Who will become India's next education minister after Dharmendra Pradhan
Dharmendra Pradhan: मोठी बातमी! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?, ओम बिर्लांची घेतली भेट

दरम्यान शिक्षण मंत्रालयात सध्या कार्यरत असलेल्या राज्यमंत्र्यांकडे तात्पुरता किंवा पूर्ण कार्यभार सोपविला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये आरएलडी (RLD) प्रमुख आणि शिक्षण व कौशल्य विकास राज्यमंत्री जयंत चौधरी, तसेच पश्चिम बंगालमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि शिक्षण राज्यमंत्री सुकांत मजुमदार यांसारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com