Abhijeet Dipke : ...तोपर्यंत इथून हटणार नाही; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही अभिजीत दिपके ठाम, स्टेजवरूनच केल्या २ मागण्या

Abhijeet Dipke Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. या आंदोलनात आता इतर दोन प्रमुख मागण्यांसाठी लढा सुरूच राहणार आहे.
UNION EDUCATION MINISTER DHARMENDRA PRADHAN RESIGNS OVER NEET PAPER LEAK ROW AFTER 26 DAYS OF STUDENT PROTESTS
UNION EDUCATION MINISTER DHARMENDRA PRADHAN RESIGNS OVER NEET PAPER LEAK ROW AFTER 26 DAYS OF STUDENT PROTESTSSaam Tv
Published On
Summary
  • जंतर मंतरवर सलग २६ दिवस चाललेल्या आंदोलनाला यश

  • केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला

  • इतर दोन प्रमुख मागण्यांसाठी लढा सुरूच राहणार

  • हे विद्यार्थ्यांचं यश असल्याची दिपके यांची माहिती

महाराष्ट्रातील नीट पेपर फुटी प्रकरणाचे पडसाद देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचल्यानांतर तरुणाईंनी दिल्लीतील जंतर मंतर येथे आवाज उठवला. cjp चे संस्थापक अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या मार्गदर्शनाखाली २६ दिवस हे आंदोलन सुरु होत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही या आंदोलनाची प्रमुख मागणी होती. दरम्यान या आंदोलनाला आज यश आले असून शिक्षण मंत्री प्रधान यांनी आपला राजीनामा दिला आहे. या विजयानंतर आंदोलकांनी दिल्लीत जल्लोष केला असून सीजेपीने सोशल मीडिया पोस्ट करत हे तरुणांचं यश असल्याचे म्हटले आहे.

गेले २६ दिवस दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी शिक्षणव्यवस्थेबाबत असलेला राग आंदोलनाच्या मार्फत सरकारसमोर व्यक्त केला. २० जुलै रोजी झालेल्या मोर्चा दरम्यान आंदोलकांवर लाठी चार्ज करण्यात आला. यानंतर हे आंदोलन चिघळलं. मात्र विद्यार्थ्यांच्या लढ्याला सरकार नरमल असून धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी याबाबत तरुणांशी जंतर मंतर वरून संवाद साधून या लोकशाहीला घाबरायचं नाही, आज सिद्ध झालं आहे की जर या सरकारसमोर झुकलो नाही तर, आपण अनेकांचे राजीनामे घेऊ शकतो.

UNION EDUCATION MINISTER DHARMENDRA PRADHAN RESIGNS OVER NEET PAPER LEAK ROW AFTER 26 DAYS OF STUDENT PROTESTS
Women Purse : महिलांनी प्रवास करताना पर्समध्ये 'या' ६ वस्तू कधीच ठेवू नयेत, जाणून घ्या कारण नाहीतर....

आतापर्यंत आपली एक मागणी मंजूर केली असून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटींची नुकसानभरपाई मिळाली पाहिजे आणि पोलिसांनी जो लाठीमार केला होता, त्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे या दोन मागण्या देखील सरकारने मान्य कराव्यात यासाठी हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं दिपके यांनी म्हटलं.

UNION EDUCATION MINISTER DHARMENDRA PRADHAN RESIGNS OVER NEET PAPER LEAK ROW AFTER 26 DAYS OF STUDENT PROTESTS
Ladki Bahin Yojana : खात्यात 1500 येईना, लाडकींचे टेन्शन वाढले; मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्वाची अपडेट

अभिजित दिपके यांनी डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा, सचिन शर्मा यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. ते म्हणाले जर आम्ही केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेऊ शकतो , तर तुम्ही काय आहात? दरम्यान हे यश विद्यार्थ्यांचं आहे. ज्यांना कॉकरोच म्हणून हिणवलं त्यांनी करून दाखवलं असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलं.आता हा मोर्चा कोणतं नवीन वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विद्यर्थ्यांच्या इतर दोन मागण्या पूर्ण होणार का? याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com