Ladki Bahin Yojana : खात्यात 1500 येईना, लाडकींचे टेन्शन वाढले; मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्वाची अपडेट

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै हप्ता लवकरच वितरित होणार असून योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहील, अशी ग्वाही मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
LADKI BAHIN SCHEME TO CONTINUE WITHOUT INTERRUPTION, SAYS ADITI TATKARE | JULY INSTALLMENT UPDATE
LADKI BAHIN SCHEME TO CONTINUE WITHOUT INTERRUPTION, SAYS ADITI TATKARE | JULY INSTALLMENT UPDATESaam Tv
Published On
Summary
  • अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहणार असल्याचे म्हटले

  • विरोधकांनी सुरुवातीपासून योजनेला विरोध केला होता, अशी टीका त्यांनी केली

  • योजनेचा एकही हप्ता थकवलेला नाही

  • महायुती सरकार लाडकी बहीण, लखपती दीदी आणि महिला शेतकरी धोरणासह विविध योजना राबवणार

राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जूनचा हप्ता महिलांना देण्यात आला असून आता जुलै महिन्याच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा आहे. दरम्यान या योजनेबद्दल टीका करणाऱ्या विरोधकांना मंत्री अदिती तटकरे यांनी खडेबोल सुनावले आहेत. तसेच ही योजना पुढेही कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या योजनेवरून विरोधकांकडून सातत्याने केली जाणारी टीका ही अपेक्षित असून, त्याकडे आपण फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.तसेच त्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबतही बोलल्या.

आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजना सुरू करण्यापूर्वीच विरोधकांनी सरकारवर आर्थिक भार पडेल, शासनाचे नुकसान होईल, अशा प्रकारचे आक्षेप घेतले होते. काहींनी तर या योजनेविरोधात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यामुळे आज त्याच लोकांकडून महिलांच्या हिताची भाषा केली जात असल्याचे पाहून आश्चर्य वाटते. ज्यांनी या योजनेला सुरुवातीपासून विरोध केला, त्यांना आता लाडक्या बहिणींची अचानक काळजी वाटू लागल्याचा टोला त्यांनी लगावला.

LADKI BAHIN SCHEME TO CONTINUE WITHOUT INTERRUPTION, SAYS ADITI TATKARE | JULY INSTALLMENT UPDATE
Women Purse : महिलांनी प्रवास करताना पर्समध्ये 'या' ६ वस्तू कधीच ठेवू नयेत, जाणून घ्या कारण नाहीतर....

सरकार जनतेसाठी चांगले काम करत असेल, तर त्यावर विरोधकांकडून टीका होणे स्वाभाविक आहे. मात्र, टीकेमुळे सरकारच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही. राज्यातील पात्र महिलांपर्यंत सर्व शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हे महायुती सरकारचे प्रमुख धोरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

LADKI BAHIN SCHEME TO CONTINUE WITHOUT INTERRUPTION, SAYS ADITI TATKARE | JULY INSTALLMENT UPDATE
Breakfast Special : ब्रेकफास्टमध्ये दररोज समोसा खाणं ठरेल धोकादायक, शरीरात होतील 'हे' गंभीर परिणाम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध योजना राबवत आहे. लाडकी बहीण योजना भविष्यातही सुरू राहील आणि तिच्या अंमलबजावणीत कोणतीही खंड पडू दिली जाणार नाही, असे तटकरे यांनी सांगितले. यंदाच्या विधिमंडळ अधिवेशनात महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र धोरण आणण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. हे धोरण राज्यातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच ‘लखपती दीदी’सह विविध योजनांद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

LADKI BAHIN SCHEME TO CONTINUE WITHOUT INTERRUPTION, SAYS ADITI TATKARE | JULY INSTALLMENT UPDATE
Hair Care Tips : केसांचे गळणे होईल कायमचे बंद! मेथी दाण्यांमध्ये 'ही' १ गोष्ट मिसळून लावा; एका आठवड्यात दिसेल जादू

लाडकी बहीण योजनेच्या निधीबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. योजनेचा एकही हप्ता थकवलेला नाही. एखाद्या महिन्यात काही कारणांमुळे लाभार्थींना रक्कम मिळाली नाही, तर पुढील महिन्यात दोन महिन्यांची रक्कम एकत्र देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com