Alisha Khedekar
समोसा तेलात तळलेला असल्याने त्यात भरपूर कॅलरी असतात. दररोज खाल्ल्यामुळे वजन वाढू शकते.
वारंवार तळलेले पदार्थ खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल वाढते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते.
जास्त तेलकट समोसा खाल्ल्याने अपचन, अॅसिडिटी, गॅस आणि पोट फुगण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
समोशात मीठाचे प्रमाण जास्त असू शकते. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी मर्यादित खावा
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर शरीर जड वाटू शकते. दिवसभर आळस आणि कामात लक्ष न लागण्याची शक्यता असते.
पुन्हा पुन्हा वापरलेल्या तेलात तयार केलेले समोसे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात आणि हृदयाचे नुकसान करू शकतात.
कधीतरी एक समोसा खाणे ठीक आहे. मात्र रोजचा नाश्ता म्हणून समोसा टाळून पौष्टिक पर्याय निवडणे अधिक फायदेशीर ठरते.