Alisha Khedekar
प्रवासात मोठी रोख रक्कम पर्समध्ये ठेवू नका. आवश्यक तेवढेच पैसे ठेवा आणि डिजिटल पेमेंटचा वापर करा.
सर्व डेबिट-क्रेडिट कार्डे एकाच पर्समध्ये ठेवणे टाळा. गरजेचे एक-दोन कार्ड सोबत ठेवा.
आधार, पॅन किंवा इतर महत्त्वाची मूळ कागदपत्रे शक्यतो घरी सुरक्षित ठेवा. गरज असल्यास प्रत वापरा.
प्रवासात महागडे दागिने पर्समध्ये ठेवू नका. हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता वाढते.
गरज नसलेली अनेक औषधे पर्समध्ये ठेवू नका. फक्त आवश्यक आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे बाळगा.
महागडे गॅझेट्स किंवा मौल्यवान वस्तू पर्समध्ये ठेवणे टाळा. सुरक्षित बॅग किंवा खिशाचा वापर करा.
घर, ऑफिस आणि इतर सर्व चाव्या एकाच पर्समध्ये ठेवू नका. आवश्यक तेवढ्याच चाव्या सोबत ठेवा.