

नाशिकमध्ये साधूच्या वेशात सोन्याचे दागिने लुटणारी टोळी
भोंदू साधूंच्या टोळीला नाशिक पोलिसांनी केली अटक
साधूच्या वेशात नागरिकांना भुरळ पाडून सोन्याची लूट
नाशिक सोन्याच्या चोरीचा पोलिसांनी लावला छडा
45 सीसीटीव्ही तपासून सोनं लुटणाऱ्या आरोपींना अटक
आता बातमी आहे सोनं लुटणाऱ्या साधूंची. साधूच्या वेशात लोकांना भुरळ पाडून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या भोंदूंच्या टोळीचा पर्दाफाश झालाय. नेमके कुठून आले हे साधू? अंगावरच्या सोन्याच्या दागिन्यांची कशी लूट करत होते? पाहूयात....
महाराष्ट्रात सध्या धार्मिक श्रद्धांचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत चाललीये. सामान्यांच्या भाबडेपणाचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्या बाबाबुवांनी राज्यात उच्छाद मांडलाय. अशाच एका भोंदूंच्या टोळीचा नाशिकच्या पोलिसांनी पर्दाफाश केलाय.
साधूच्या वेशात येऊन संधी साधून सोन्याच्या अंगठ्या लंपास करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात... तब्बल 45 सीसीटीव्हीची तपासणी करून 2 आरोपींना मध्यप्रदेशच्या नर्मदा किनाऱ्यावरुन अटक केलीये.
साधूच्या वेशात हे भोंदू सामान्यांना कसा गंडा घालत होते ते तक्रारदारांच्याच तोंडून ऐकूयात. या दोन भोंदूंकडून 2 लाख 80 हजारांचं वितळवलेलं सोनं हस्तगत करण्यात आलंय. एव्हंढच नाही तर या टोळीनं आणखी किती ठिकाणी अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत, याचा सखोल तपास सुरू आहे. त्यामुळे पुढील काळात साधूच्या वेषात नागरिकांना लुटणाऱ्या टोळीसंदर्भात आणखी काळे कारनामे समोर येतात का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.