Shreya Maskar
नाशिक हे महाराष्ट्रातील एक प्राचीन शहर आहे. पावसाळ्यात एकदा तरी नाशिकची सफर करा. तुमच्या कुटुंबाला ही ऐतिहासिक ठिकाणे नक्की फिरवा.
पांडव लेणी ज्याला 'त्रिरश्मी लेणी' म्हणूनही ओळखले जाते. ही महाराष्ट्रातील नाशिकजवळील त्रिरश्मी टेकड्यांमध्ये कोरलेल्या २४ प्राचीन बौद्ध लेण्यांचा ऐतिहासिक समूह म्हणून प्रसिद्ध आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असलेल्या बारा पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग तिथे असल्यामुळे प्रसिद्ध आहे. या मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे प्रतिनिधित्व करणारे तीन मुखे असलेले एक अद्वितीय शिवलिंग आहे.
चामर लेणी म्हसरूळ गावात आहेत. गावातील ४०० फूट उंच टेकडीवर वसलेल्या या चौथ्या शतकातील जैन लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ४५० दगडी पायऱ्या चढाव्या लागतात.
येथे प्राचीन दिगंबर जैन शिल्पे पाहायला मिळतात आणि पांडवलेणीसारख्या गर्दीच्या ठिकाणांच्या तुलनेत हे एक शांत व निवांत ठिकाण आहे.
नाशिकपासून वायव्येला साधारण १० किलोमीटर अंतरावर रामशेज हा डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्यावर पाण्याची गुप्त टाके, निसटण्यासाठीच्या गुप्त गुहा आणि जुन्या तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात.
इगतपुरी तालुक्याजवळ असलेल्या या ऐतिहासिक किल्ल्याच्या परिसरात नैसर्गिक पाण्याचा बारमाही झरा आहे. हा परिसर शांत धार्मिक स्थळांनी वेढलेला असून स्थानिक संत-परंपरेशी त्याचे खोल नाते आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.