Pune : स्वयंघोषीत आध्यात्मिक गुरूचं भयंकर कांड, तरुणीला मागीतले अर्धनग्न फोटो; पुण्यात भोंदू बाबाचा पर्दाफाश

Pune News : पुण्यात कथित आध्यात्मिक गुरूने तरुणीकडे अर्धनग्न फोटो मागितल्याचा आरोप आहे. कोंढवा पोलिसांनी २३ वर्षीय दिव्य जितेंद्र परमारला अटक केली असून डिजिटल पुराव्यांचा तपास सुरू आहे.
Pune Spiritual Guru Arrested For Allegedly Demanding Semi-Nude Photos
Pune Spiritual Guru Arrested For Allegedly Demanding Semi-Nude PhotosSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यात कथित आध्यात्मिक गुरूने तरुणीकडे अर्धनग्न फोटो मागितल्याचा आरोप

  • २३ वर्षीय दिव्य जितेंद्र परमारला कोंढवा पोलिसांनी अटक केली

  • सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून आरोपी स्वतःचा प्रचार करत असल्याची माहिती

  • पोलिसांचा पुढील तपास सुरु

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, मोटीव्हेशनल स्पीकर असल्याचे सांगत कथित अध्यात्मीक गुरूने तरुणीकडे अर्धनग्न फोटो मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. दिव्य जितेंद्र परमार असे या कथित आध्यात्मिक गुरुचे नाव आहे. दरम्यान या घटनेने पुण्यात सुरु असलेल्या देवदेवतांच्या नावाखाली भोंदूगिरीच्या प्रकारांवर संताप व्यक्त केला जात आहे.

साम टीव्हीच्या सूत्रांनुसार,दिव्य परमारने महाविद्यालयात व्यवसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले. हे शिक्षण घेत असतानाच त्याने मोटिवेशनल स्पीकर म्हणून स्वताःचा प्रचार सुरू केला होता. वयाच्या १८ व्या वर्षीच त्याने ठिकठिकाणी भाषणं द्यायला सुरुवात केली. कालांतराने त्याने सोशल मीडियावर स्वतःच्या नावाचे एक चॅनेल सुद्धा सुरू केलं. या चॅनलच्या माध्यमातून त्याने आपले "फॉलोवर" तयार केले. पुढे अशा चाहत्यांकडून तो शुल्क आकारून त्यांच्यासाठी व्याख्यान देऊ लागला. काही दिवसानंतर त्याने स्वतःला अध्यात्मिक गुरु म्हणून घेण्यास सुरुवात केली. त्याच्या संपर्कातील महिला आणि तरुणींना तो व्यायाम विषयक टिप्स देत असे. "तुमची व्यायामातील प्रगती करायची असेल तर अर्धनग्न फोटो पाठवा", अशी मागणी तो करत आणि काहींना भीती सुद्धा दाखवत असायचा.

Pune Spiritual Guru Arrested For Allegedly Demanding Semi-Nude Photos
Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मिडिया द्वारे आपण एक इन्फ्लुएन्सर असल्याचे सांगत आरोपी ने तक्रारदार यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्याने आपण एक आध्यात्मिक गुरू असल्याचे ही तक्रारदार यांना सांगितले. फिर्यादी यांच्याशी ओळख झाल्यानंतर आरोपी ने तरुणीला "फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी च्या माध्यमातून शरीरामध्ये गेलेली नकारात्मक ऊर्जा काढून टाकता येते", असे सांगून तिच्याशी बोलू लागला.

Pune Spiritual Guru Arrested For Allegedly Demanding Semi-Nude Photos
Rain Alert : महाराष्ट्रात विजांसह वादळी पाऊस ; ४ जिल्ह्यांना येलो अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

परमार ने संबंधित तरुणीला भीती दाखवून तिचे अर्धनग्न फोटो मोबाईलवरून मागवून घेतले. घाबरलेल्या तरुणीने थेट पोलिसात धाव घेत घडलेला सगळा प्रकार सांगितला. तक्रारीच्या आधारे कोंढवा पोलिसांनी परमारवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. तपासादरम्यान आरोपीचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला असून, त्यातील माहिती, फोटो, मेसेज, व्हिडिओ तसेच इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी केली जात आहे.

Pune Spiritual Guru Arrested For Allegedly Demanding Semi-Nude Photos
Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

आरोपीने आणखी कोणाशी अशा प्रकारे संपर्क साधला होता का, याचा तपास सुद्धा सुरू आहे. कोंढवा पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७५, ७८, ७९ व ३१८(४) विनयभंग तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायदा, २०१३ मधील कलम ३(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलिसांनी या तरुणाला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com