Nashik: पतीचा गळा चिरला, १८ तास मृतदेह घरातच ठेवला; मध्यरात्री कसारा घाटात नेऊन फेकला

Nashik Wife Allegedly Kills Husband With Lover Over Illicit Relationship: नाशिकमध्ये अनैतिक संबंधांत अडथळा ठरत असल्याच्या कारणातून पती वसंत सातपुते यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराच्या मदतीने हत्या केल्यानंतर मृतदेह १८ तास घरात ठेवून कसारा घाटात फेकल्याची प्राथमिक माहिती आहे.
Nashik wife allegedly kills husband with lover over illicit relationship
Nashik wife allegedly kills husband with lover over illicit relationshipsaam tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिकमध्ये अनैतिक संबंधांत अडथळा ठरत असल्याच्या कारणातून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीने मित्राच्या मदतीने पतीचा गळा चिरून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. हत्या केल्यानंतर तब्बल १८ तास मृतदेह घरात ठेवण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री कारमधून मृतदेह कसारा घाटात नेऊन फेकण्यात आला. मृत व्यक्तीचे नाव वसंत गोरखनाथ सातपुते असे आहे. मद्यपान आणि जुगाराच्या नादासोबतच अनैतिक संबंधांमध्ये पती अडथळा ठरत असल्याने हा कट रचण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

Nashik wife allegedly kills husband with lover over illicit relationship
Washim Crime: अनैतिक संबंधात अडथळा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं, मृतदेह शेतात फेकला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने आपल्या मित्राच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार पतीचा गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तब्बल १८ तास घरातच ठेवण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री कारमधून मृतदेह कसारा घाटात नेऊन फेकण्यात आला.

Nashik wife allegedly kills husband with lover over illicit relationship
Shocking : रात्री एकत्र जेवले, सकाळी मृतदेहच भेटला; प्रियकराच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या पत्नीनं घेतला जीव

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत कसारा घाटातून मृतदेह शोधून काढला. या प्रकरणात हसीना शेख, साहिल शहा आणि मोईन शहा यांच्यासह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. या हत्येमागे नेमका कोणाचा सहभाग होता, हत्या कशी करण्यात आली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी आणखी काही प्रयत्न झाले का, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

Nashik wife allegedly kills husband with lover over illicit relationship
Kalyan Crime: कल्याण हादरले! डोक्यावर वार करत तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह गोणीत भरून २४ तास पाण्यात ठेवला

वसंत सातपुते हे याआधी स्वतःची रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होते. ते हसिनासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. दरम्यान हसीना आणि साहिल यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या संबंधात सातपुते यांचा अडथळा येऊ लागल्याने त्यांनी दोघांनी साथीदारांच्या मदतीने त्यांचा कायमचा काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com