Shocking : रात्री एकत्र जेवले, सकाळी मृतदेहच भेटला; प्रियकराच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या पत्नीनं घेतला जीव

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशात प्रेमसंबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप. पत्नी व प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
JAUNPUR MURDER CASE: WIFE AND LOVER ACCUSED OF KILLING HUSBAND IN UTTAR PRADESH
JAUNPUR MURDER CASE: WIFE AND LOVER ACCUSED OF KILLING HUSBAND IN UTTAR PRADESHSaam Tv
Published On
Summary
  • उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये प्रेमसंबंधाच्या संशयातून पतीच्या हत्येची धक्कादायक घटना

  • पत्नी आणि तिच्या प्रियकराने गळा आवळून हत्या केली

  • मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

  • घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू

उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात प्रेमसंबंधातून एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापूर कोतवाली हद्दीतील भलुआही वार्ड क्रमांक ८ येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत चंद्रदीप गौतम (वय २७) हा नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून आपल्या खोलीत झोपला होता. त्यानंतर रात्री सुमारे ११ वाजल्यानंतर त्याची पत्नी वंदना हिने तिचा प्रियकर राजेश कुमार याच्या मदतीने गमछ्याने गळा आवळून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. राजेश हा बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गजाधरपूर गावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

JAUNPUR MURDER CASE: WIFE AND LOVER ACCUSED OF KILLING HUSBAND IN UTTAR PRADESH
Kitchen Hacks : करपलेल्या भांड्यांवरचा काळपटपणा चुटकीसरशी होईल गायब, 'या' सोप्या टिप्स करून पहा

मृताच्या वडिलांनी, लालजी गौतम यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पत्नी वंदना आणि तिचा प्रियकर राजेश कुमार यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. घटनेनंतर दोघेही घरातून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पोलिसांकडून छापेमारी सुरू आहे.

JAUNPUR MURDER CASE: WIFE AND LOVER ACCUSED OF KILLING HUSBAND IN UTTAR PRADESH
E20 Fuel Protest : मोठी बातमी! GEN G नंतर आता आणखी एक आंदोलन; E 20 वरून सरकारला घेरणार, या ६ मागण्या केल्या

घटनेची माहिती मिळताच प्रभारी निरीक्षक फूलचंद पांडेय घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासात हे प्रकरण प्रेमसंबंधातून घडल्याचे दिसत असले, तरी शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com