सागर निकवाडे
नंदुरबार : महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर असलेल्या नवापूरपासून गुजरातमध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. या महामार्ग दरम्यान चिंचपाडा ते कोळदा ;अशा रेल्वे लाईनवर फाटक आहे. दरम्यान या रेल्वे लाईनच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यामुळे सदरचे रेल्वे गेट बंद असल्याने महामार्गावरील वाहतूक देखील पुढील ९ दिवसांसाठी बंद राहणार आहे.
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहन गुजरात राज्यात ये- जा करीत असतात. मात्र चिंचपाडा ते कोळदा दरम्यान रेल्वे रुळ दुरुस्तीच्या काम सुरु आहे. तसेच याठिकाणी दुसऱ्या रेल्वे लाईन टाकण्याचे काम देखील सुरु आहे. यामुळे नंदुरबार ते नवापूर (Navapur) मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर ७४ चिंचपाडा ते कोळदा या मार्गावरील वाहतुक ९ ऑगस्ट बंद करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश दिले आहे.
वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविली
रेल्वे लाईन दुरुस्तीच्या कामाला सुरवात करण्यात येणार असल्याने या मार्गावरील पर्यायी वाहतूक उच्च्छल- धानोरा मार्गे नंदुरबारकडे व नंदुरबारकडून गुजरात राज्याकडे जाणारी वाहने त्याच मार्गे जातील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.