Palghar Zp School : शिक्षण हक्क कायदा कागदावरच; जिल्हा परिषद शाळेत केवळ ५ विद्यार्थी हजर

Palghar news : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषद आसे ही केंद्र शाळा आहे. तरी देखील येथे गंभीर प्रकरण समोर आले आहे.
Palghar Zp School
Palghar Zp SchoolSaam tv
Published On

फैय्याज शेख 

मोखाडा (पालघर) : शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले पाहिजे. या बरोबर कायद्यात अनेक बाबींचा समावेश आहे. परंतु मोखाडा तालुक्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले असून सगळा कारभार फक्त कागदोपत्री चालल्याचे दिसून येत आहे. कारण तालुक्यातील आसे येथील जिल्हा परिषद शाळेत केवळ ५ विद्यार्थी उपस्थित असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

Palghar Zp School
Farmer Success Story : सेंद्रिय पद्धतीने रानभाजीचा केला यशस्वी प्रयोग; कर्टुले लागवडीतून चार महिन्यात ३ लाख ७५ हजाराचे उत्पादन


पालघर (Palghar) जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषद आसे ही केंद्र शाळा आहे. तरी देखील येथे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या (Zp School) शाळेत पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग असून येथे एकुण ५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र यातील गंभीर बाब म्हणजे १५ जूनपासून शाळा सुरू झाली. परंतु शाळा सुरु झाल्यापासून चौथीचा १, सहावीचे २ आणि सातवीमध्ये केवळ २ असे फक्त पाचच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर बाकीचे विद्यार्थी अद्याप शाळेतच आले नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. 

Palghar Zp School
Jamner News : विजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा मृत्यू; विद्युत पोलवर काम करताना घडली घटना

शाळेत केवळ विद्यार्थीचे कागदोपत्री पट दाखवले  गेल्याने बाकीचे उरलेल्या ५१ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी आसे (Zilha Parishad) जिल्हा परिषद गटाचा दौरा केला होता. मात्र येवढी मोठी गंभीर बाब त्यांच्या लक्षात कशी नाही? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असून त्यांचा हा दौरा फोल ठरला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com