Farmer Success Story : सेंद्रिय पद्धतीने रानभाजीचा केला यशस्वी प्रयोग; कर्टुले लागवडीतून चार महिन्यात ३ लाख ७५ हजाराचे उत्पादन

Maval News : ब्रोकोली, फॅमिली, पार्सली, रेड कॅमन, स्ट्रॉबेरी, झुलेगी. आणि हॉटेलला चालणाऱ्या चायनीज पद्धतींच्या अनेक भाज्याच पीक शेतात घेतात
Farmer Success Story
Farmer Success StorySaam tv
Published On

मावळ : सध्याच्या संकरित शेतीमालाच्या जमान्यात रानभाज्याचे महत्त्व कमी होत चाललं आहे. खरंतर रानभाज्या दुर्मिळ होत चालल्या आहे. मात्र खेड तालुक्यातील चिंबळीच्या सीमा जाधव या महिला शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने कर्टुले या रानभाजीचे पीक घेऊन यशस्वी प्रयोग केला. इतकेच नाही तर यातून चार महिन्यात तब्बल पावणेचार कोटींचे उत्पादन घेतले आहे. 

Farmer Success Story
Amalner News : फवारणी करताना विहिरीतील मोटारीच्या वायरला स्पर्श; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

आरोग्यासाठी पौषक आणि तितकेच रुचकर असलेल्या रानभाज्या ग्रामीण भागातील लोकांना मुबलक खायला मिळतात. मात्र शहरातील लोक या रानभाज्यापासून अनेकदा वंचित राहतात. त्याचं कारण म्हणजे रानभाजीचं इतर पिकासारखी कुठेही शेती केली जात नाही. (Farmer) शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. इतर कोणत्याही पिकाचा विचार करत नाही. मात्र चिंबळीच्या महिला शेतकरी सीमा जाधव या अपवाद ठरल्या आहे. सीमा जाधव या आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करीत असतात. ब्रोकोली, फॅमिली, पार्सली, रेड कॅमन, स्ट्रॉबेरी, झुलेगी. आणि हॉटेलला चालणाऱ्या चायनीज पद्धतींच्या अनेक भाज्याच पीक शेतात घेतात. 

Farmer Success Story
Pimpri Chinchwad : विद्युत रोहित्रांची चोरी करणारी टोळी ताब्यात; ३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

यावर्षी त्यांनी आपल्या शेतात एक वेगळाच प्रयोग केला. सीमा जाधव यांनी आपल्या २० गुंठ्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने कर्टुलेची लागवड केली. १५ मेस त्यांनी लागवड केली. ४५ दिवसानंतर कर्टुले तोडायला सुरवात झाली. पहिला तोडा ३० किलोचा निघाला. नंतर ते वाढतच ८० किलो दर आठवड्याला कर्तुळे काढतात. चार महिन्यात १५०० किलोचे उत्पन्न घेतलं. सध्या  कर्टुलेला बाजार भाव प्रति कीलो २०० ते २५० रुपये किलोचे आहे. यामुळे चार महिन्यात ३ लाख ७५ हजार रुपयेच उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यामुळे यांना फारसा खर्च नाही. कोणत्याही प्रकारची फवारणी केली जात नाही. एकदा लागवड केलेले कर्टुलेची रोपे दहा ते बारा वर्ष उत्पन्न देतात.

कर्टुलेचे आरोग्यासाठी फायदे 

कर्टुले ही आयुर्वेदिक भाजी आहे. मधुमेहावर अत्यंत गुणकारी रान भाजी आहे. ही भाजी पचण्यास हलकी आहे. पोटाचे विकार कमी होतात. कर्टुलेच्या पाल्याचा रस डोक्याला लावला, तर डोकेदुखी ही थांबते. मुळव्याधीवरही  कर्टुलेची भाजी रामबाण उपाय आहे. या रानभाज्या मुख्यता चंद्रपूर, गडचिरोली, भामरागड आणि जिथे जास्त पाऊस पडतो. त्या भागात कर्तुळे ही रानभाजी उगवते. मात्र महिला शेतकरी सीमा जाधव यांनी आपल्या शेतात  कर्टुलेच पीक घेतलं आहे. पुणे जिल्ह्यात हा प्रथमच प्रयोग महिला शेतकऱ्यांनी केलेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com