Pimpri Chinchwad : विद्युत रोहित्रांची चोरी करणारी टोळी ताब्यात; ३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक क्षेत्रात महापारेषणकडून रोहित्र उभारण्यात आले आहे. मात्र या रोहित्राचे काही साहित्य चोरीला गेले होते
Pimpri Chinchwad
Pimpri ChinchwadSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र विद्युत पारेषण विभागाच्यावतीने उभारण्यात आलेल्या विद्युत रोहित्राची चोरी झाली होती. या ही चोरी करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून जवळपास ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

Pimpri Chinchwad
Maharashtra Rain IMD Alert: सावधान! राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील चार दिवस धोक्याचे; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

पिंपरी चिंचवडच्या (Pimpri Chinchwad) औद्योगिक क्षेत्रात महापारेषणकडून रोहित्र उभारण्यात आले आहे. मात्र या रोहित्राचे काही साहित्य चोरीला गेले होते. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली होती. यावरून पोलिसांनी (Police) शोध घेतला असता या प्रकरणात महाळुंगे पोलीसांनी रमेश पडवळ, सुनिल गावडे, रवींद्र गावडे, उस्मान अब्बुहरेरा आणि कार्तिक पवार यांना ताब्यात घेतले आहे. या रोहित्र चोरणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या मुळे महाळुंगे, चाकण आणि हिंजवडी पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलीसांना यश आलं आहे.

Pimpri Chinchwad
Amalner News : फवारणी करताना विहिरीतील मोटारीच्या वायरला स्पर्श; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

रोहित्र चोरणाऱ्या टोळीकडून महाळूंगे पोलिसांनी जवळपास २ लाख ७५ हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा आणि अल्युमिनियमच्या पट्ट्या जप्त केल्या आहेत. तसेच रोहित्र चोरण्यासाठी वापरण्यात आलेली जवळपास ५ लाख २५ हजार रुपये किंमतीची वाहने देखील जप्त केले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांची अजून चौकशी सुरु असून आणखी काही चोरीची उकल होण्याची शक्यता आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com